स्पर्धा परीक्षार्र्थींची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:22 PM2018-02-16T22:22:42+5:302018-02-16T22:23:46+5:30

शासनाने सरकारी नोकरभरतीबाबत लादलेल्या जाचक अटी-शर्तींच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाभरातील बेरोजगार तरुण जिल्हा कचेरीवर धडकले.

Competition exam | स्पर्धा परीक्षार्र्थींची धडक

स्पर्धा परीक्षार्र्थींची धडक

Next
ठळक मुद्देहजारो उमेदवारांचा उत्स्फूर्त सहभाग : नोकरकपातीचा निर्णय जाचक

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शासनाने सरकारी नोकरभरतीबाबत लादलेल्या जाचक अटी-शर्तींच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाभरातील बेरोजगार तरुण जिल्हा कचेरीवर धडकले. यावेळी कठोरा नाक्याहून शेकडोंचा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन देत, जाचक अटी दूर करण्याची मागणी त्यांनी केली.
स्पर्धा परीक्षेसाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची भरमसाठी शुल्क घेऊन शासनाने गळचेपी केली आहे. एकीकडे बेरोजगारी व त्यासोबतच युवकांची शैक्षणिक पात्रता वाढत आहे. राज्यात १ लाख ७० हजार व केंद्रात ४ लाख २० हजार पदे रिक्त आहेत. त्याबाबत कुठलेही धोरण शासनाकडे नाही. परीक्षा शुल्कदेखील जीएसटीसह घेतले जात आहे. सर्व घटकांतील उमेदवारांना एकसमान शुल्क व चलान भरण्याची मागणी यावेळी युवकांनी केली. अपंग, सैनिक, विधवा शुल्कातून वगळावे, साबांविच्या कनिष्ठ अभियंत्यांची सरळ सेवा भरती त्वरित करावी, पोलीस भरतीच्या संख्येत वाढ करावी, सरकारी नोकºयांच्या कपातीचे धोरण रद्द करावे, अभियोग्यता चाचणीनुसार पात्र शिक्षक उमेदवारांची भरती करावी आदी मागण्याही करण्यात आल्या. कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय निघालेल्या मोर्चात सारंग जवखेडे, अक्षय नरगडे, सुशांत पोरे, सिद्धार्थ तायडे, चंदन तिडके, हर्षद धांडे, रोहित कोणटके यांच्या संयोजनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.
घोषवाक्यांनी वेधले लक्ष
मोर्चातील विद्यार्थ्यांनी विविध लक्षवेधी घोषवाक्याचे फलक हातात घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. ‘आमचा हक्क - आमचा अधिकार’, ‘कमी पदामुळे विद्यार्थी त्रस्त - शासन मात्र आपल्या धुंदीत मस्त’, ‘नोकरी आमच्या हक्काची - नाही कुणाच्या बाप्पाची’ असे घोषवाक्य हातात घेत उमेदवारांनी जिल्हा कचेरी परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.

Web Title: Competition exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.