सरसंघचालकांसह मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 10:30 PM2018-01-02T22:30:18+5:302018-01-02T22:30:58+5:30

भीमा कोरेगाव घटनेचे संतप्त पडसाद तिवसा शहरात उमटले. मंगळवारी आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघचालक मोहन भागवत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

Chief Minister's statue burnt with sarsanghchalakas | सरसंघचालकांसह मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

सरसंघचालकांसह मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

Next
ठळक मुद्देतिवस्यात जाळपोळ : भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद

आॅनलाईन लोकमत
तिवसा : भीमा कोरेगाव घटनेचे संतप्त पडसाद तिवसा शहरात उमटले. मंगळवारी आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघचालक मोहन भागवत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
येथील आंबेडकर पुतळ्यापासून बाबासाहेब आंबेडकर यांना हारार्पण करून हा मार्च पेट्रोलपंप चौकात आला यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत रस्त्यावर पुतळा जाळून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. आंदोलनात आशिष ढोले, राज मोहोरे, गजानन रामटेके, प्रफुल्ल मकेश्वर, सिद्धार्थ मुद्रे, प्रशिक मकेश्वर, विनोद तांगडे, अजय दलाल, सूरज मकेश्वर, सतीश यावले, शिवा शापामोहन, रुपेश मकेश्वर आदींचा समावेश होता.

Web Title: Chief Minister's statue burnt with sarsanghchalakas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.