बच्चू कडूंनी लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:16 AM2018-04-27T01:16:58+5:302018-04-27T01:16:58+5:30

 Chappell bitter busted manager's closet | बच्चू कडूंनी लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात

बच्चू कडूंनी लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात

Next
ठळक मुद्देहायवेच्या कामात दुर्लक्ष : नागरिकांचा त्रासाचा उद्रेक

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी परतवाडा-मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील सुपरवायझरच्या कानशिलात लगावली. सर्वसामान्यांसह आमदारांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने हा प्रकार घडला.
नागरिकांची सुरक्षा व नियम धाब्यावर बसवून या बांधकामात पिवळी मातीचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गुरुवारी या मार्गावर एक अपघात झाला. तो पाहून आ. कडू यांनी सुपरवायझरच्या कानशिलात हाणल्या.
महामार्गाच्या कामात पिवळी माती
चांदूरबाजार : राष्ट्रीय महामार्गाचे कामात पिवळ्या मातीवर पाणी टाकले जात नाही. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना दृष्टीरोग, अस्थमा, चर्मरोग आजाराचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याचा कंत्राट एच.जी. इन्फ्रा कंपनीने घेतला आहे. या मार्गावर काही ठिकाणी चिखल झाला आहे. गुरुवारी सकाळी आ. बच्चू कडू कुरळपूर्णा येथून चांदूर बाजार येथे परत येत असताना हैदतपूर वडाळा या गावाजवळ रस्त्यावरील चिखलामुळे एक विद्यार्थी घसरून पडला. रस्त्यावर पाणी टाकल्याने सर्वत्र पिवळी माती उडत होती. याची दखल घेत आ. कडू यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या सुपरवायझरला विचारणा केली. मात्र सुपरवायझरतर्फे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतापलेल्या आ. बच्चू कडू यांनी त्याच्या कानशिलात हाणल्या. तसेच २४ तासात रस्त्याच्या बांधकामात पाण्याचा योग्य वापर न केल्यास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या कानशिलेत हाणणार असल्याचा इशारा दिला.

Web Title:  Chappell bitter busted manager's closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.