सिटी लॅन्डमध्ये धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 09:38 PM2019-01-11T21:38:19+5:302019-01-11T21:38:44+5:30

नागपूर रोडवरील सिटी लॅन्ड व्यापारी संकुलातील सहा प्रतिष्ठानांतून चोरांनी मोठी रोख लंपास केली. शुक्रवारी सकाळी ही बाब उजेताच येताच प्रचंड खळबळ उडाली. एअर कूलरच्या डक्टिंगमधून शिरलेल्या चोरांनी एकाच वेळी सहा व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये चोरी केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Brave stolen in the City Land | सिटी लॅन्डमध्ये धाडसी चोरी

सिटी लॅन्डमध्ये धाडसी चोरी

Next
ठळक मुद्देसहा व्यापारी प्रतिष्ठानांतून मोठी रोकड लंपास : डक्टिंगमधून शिरले चोर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपूर रोडवरील सिटी लॅन्ड व्यापारी संकुलातील सहा प्रतिष्ठानांतून चोरांनी मोठी रोख लंपास केली. शुक्रवारी सकाळी ही बाब उजेताच येताच प्रचंड खळबळ उडाली. एअर कूलरच्या डक्टिंगमधून शिरलेल्या चोरांनी एकाच वेळी सहा व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये चोरी केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अमरावती ते नागपूर रोडवरील नांदगाव पेठ हद्दीत सिटी लॅन्ड हे मोठे व्यापारी संकुल आहे. या होलसेल कापड बाजारातून दररोज कोट्यवधीची उलाढाल होते. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सर्व व्यापारी वर्ग आपआपली प्रतिष्ठाने बंद करून घरी गेले. शुक्रवारी प्रतिष्ठान उघडताच चोरांनी सहा व्यापाºयांकडील रोकड लंपास केल्याचे निदर्शनास आले. घटनेच्या माहितीवरून नांदगाव पेठसह गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा सिटी लॅन्डमध्ये पोहोचला. पोलिसांनी तपास सुरू केला असता, चोरांनी प्रतिष्ठानाच्या वरच्या मजल्यावर असणाºया डक्टिंगमधून शिरकाव केल्याचे निदर्शनास आले. चोरांनी डक्टिंगचा लोखंडी पत्रा उघडून व आतील कापड फाडून प्रतिष्ठानात प्रवेश केला आणि सहाही व्यापारी प्रतिष्ठानांतील सुमारे २५ लाखांची रोख लंपास केली. ही माहिती पसरताच सर्व व्यापाºयांनी चोरी झालेल्या प्रतिष्ठानांसमोर प्रचंड गर्दी केली होती. घटनेच्या माहितीवरून पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक पोलीस आयुक्त रणजित देसाई, पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक पंजाब वंजारी, पोलीस उपनिरीक्षक राम गिते, चाटे, ढोके आदी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला होता.
यांच्या प्रतिष्ठानात चोरी
सिटी लॅन्टच्या पहिल्या टप्प्यातील ही सर्व व्यापारी प्रतिष्ठाने असून, दिनेश हरीश पुरसवानी (३०, रा. क्रिष्णानगर) यांच्या शगुन साडीज, मोहन नोटानदास खाकानी (५२, रा. व्हीआरपी कॉलनी, कंवरनगर) यांचे मोहन टेक्सटाइल्स, अमरलाल कन्हैयालाल बख्तार (६०, रा. बालाजीनगर) यांचे साई सारीज, प्रदीप निश्चलदास सोजरानी (४५, रा. एकवीरानगर) यांचे वर्षा सारीज, मनीष अर्जुनदास केशवानी व राजेश होलाराम सावरा (४५, दोन्ही रा. सत्यकृपा कॉलनी) व मोती गोविंददास पिंजाणी (४७, रा.रामपुरी कॅम्प) यांच्या वंशिका शॉपिंग मॉलमध्ये चोरांनी हात साफ केला आहे.

सिटी लॅन्डमध्ये ३० सुरक्षा रक्षक
सिटी लॅन्डसारख्या भव्यदिव्य अशा व्यापारी संकुलाच्या सुरक्षेसाठी तब्बल ३० सुरक्षा तैनात असतात. याशिवाय नांदगाव पेठ पोलिसांचीही रात्रकालीन गस्त असते. इतकी मोठी सुरक्षा असतानाही चोरी झाल्याची बाब व्यापाºयांसाठी आश्चर्यचकित करणारीच ठरली आहे.

मोठी रक्कम प्रतिष्ठानात ठेवण्याचे कारण काय?
सिटी लॅन्ड येथील लब्धप्रतिष्ठित व्यापाºयांकडून मोठी रक्कम चोरांनी लंपास केल्याचे सांगण्यात आले. दिवसभराच्या व्यापारातून गोळा झालेली रक्कम एक तर बँकेत जमा केली जाते किंवा ती घरी नेली जाते. मात्र, व्यापाºयांनी इतकी मोठी रक्कम प्रतिष्ठानातच का ठेवली, हा मुद्दा संशयाला घर निर्माण करणारा ठरत आहे. यामागे काही वेगळे कारण असण्याची शक्यता असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

धाडसी चोरांचे आव्हान
चोरीच्या घटनेनंतर एकत्रित जमलेल्या व्यापाºयांमध्ये कुजबुज सुरू झाली होती. प्रथमच एकाच वेळी सहा प्रतिष्ठानांत चोरी करून चोरांनी आपल्याला आव्हानच दिल्याच्या प्रतिक्रिया व्यापाºयांमध्ये होत्या. चोरांच्या या धाडसामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण दिसून आले.
सीसीटीव्हीत अल्पवयीन कैद
सिटी लॅन्डच्या बहुतांश व्यापारी संकुलांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. मात्र, प्रतिष्ठान बंद करताना बहुतेक ठिकाणी सीसीटीव्ही बंद करून ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले. तथापि, एका प्रतिष्ठानातील सीसीटीव्हीत अल्पवयीन मुलगा कैद झाल्याची माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे.

Web Title: Brave stolen in the City Land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.