धुऱ्यावरील आगीत झाडांचे मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:55 AM2019-04-24T00:55:53+5:302019-04-24T00:56:15+5:30

अलीकडे उन्हाळा लागला की, धुरे अन् रस्त्याच्या कडेचे शुष्क गवत पेटविण्याचा मोसम सर्वत्र नजरेत पडतो. मात्र या पेटवापेटवीत शेकडो जिवंत बहरलेली झाडे तसेच शासनाने अमाप खर्च करून लावलेली रोपे मरतात, याची कुणालाही फिकीर नाही.

Blaze Fire | धुऱ्यावरील आगीत झाडांचे मरण

धुऱ्यावरील आगीत झाडांचे मरण

Next
ठळक मुद्देवृक्षांची कत्तल वाढली : महसूल, वनविभागाचे दुर्लक्ष, भरदिवसा रस्त्यालगतच्या झाडांना लावली जाते आग

रवींद्र वानखडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वनोजा बाग (अंजनगाव सुर्जी) : अलीकडे उन्हाळा लागला की, धुरे अन् रस्त्याच्या कडेचे शुष्क गवत पेटविण्याचा मोसम सर्वत्र नजरेत पडतो. मात्र या पेटवापेटवीत शेकडो जिवंत बहरलेली झाडे तसेच शासनाने अमाप खर्च करून लावलेली रोपे मरतात, याची कुणालाही फिकीर नाही. विशेष म्हणजे, आगीमुळे उन्मळून पडलेल्या झाडांच्या लाकडाची सर्वांदेखत वाहतूक होत असतानाही शासकीय विभाग त्याबाबत जाब विचारत असल्याचे चित्र कुठेच नाही.
एकीकडे शासन झाडे लावण्यासाठी अमाप पैसा खर्च करीत आहे. दुसरीकडे दिवसाढवळ्या रस्त्याने लावलेल्या आगीत उभी झाडे पेटविली जात आहेत. शेतातील धुºयाचे गवत पेटविण्यासाठी तसेच नदी-नाल्याकाठी सफाईच्या नावावर शेतकरी आगी लावतात. ती आग झाडांना कवेत घेते आणि अखेर झाडे कोसळतात. विशेष म्हणजे, आगीच्या नोंदीची जबाबदारी पटवाºयाकडे असताना, त्यांचे त्याकडे लक्षच नाही. नेमून दिलेल्या ठिकाणी भेट दिली, की वास्तव्याच्या ठिकाणी निघून जाण्यात ते धन्यता मानतात. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.

वृक्षारोपण योजनेचा फज्जा
राज्य शासनाने वृक्षारोपण योजनेकरिता अमाप खर्च केला. रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले. ती झाडे जगविण्याकरिता बचतगटांना उद्युक्त केले. मात्र, रस्त्याच्या कडेला लावलेल्या आगीमुळे वृक्षारोपण योजनेचा फज्जा उडाला आहे.

लाकडाची दिवसाढवळ्या वाहतूक
ग्रामीण भागातून झाडे कटाई करून ट्रक, छोटा हत्ती अशा वाहनांमध्ये कापलेली झाडांची लाकडे राजरोसपणे तालुक्याच्या ठिकाणी वाहून नेली जातात. परंतु, त्याबाबत जाब विचारण्याऐवजी सर्व अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे.

खासगी कंपनीचे अजब तर्कट
सामाजिक वनीकरण विभागातर्फे अंजनगाव-दर्यापूर मार्गाने वृक्षारोपण करण्यात आले. बहरलेली झाडे खासगी कंपनीच्या केबल डक्टिंगमुळे मोठ्या प्रमाणात तुटून गेली. तेवढी झाडे पुन्हा लावून देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सामाजिक वनीकरणाच्या अधिकाºयांनी सांगितले होते. उलट मजुरांच्या खिशातून रोपे आणून ती लावण्यास भाग पाडले गेले.

कर्मचारी मूग गिळून
शेतातील वा रस्त्यालगतत झाडे तोडून अंजनगाव किंवा दर्यापूर तालुक्यात लाकडे वाहून नेली जात आहेत. तथापि, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाहीत. आज जिल्हाभर मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम चालू असून, त्याच्या दुतर्फा महाकाय वृक्षांची तोड होत आहे.

Web Title: Blaze Fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग