महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:15 PM2017-11-21T23:15:06+5:302017-11-21T23:15:26+5:30

काही अज्ञात अतिक्रमणधारकांनी हमालपुरा झोन कार्यालयात मंगळवारी दुपारी तोडफोड केली.

Beat up municipal corporation employees | महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण

महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण

Next
ठळक मुद्देहमालपुरा कार्यालयात तोडफोड : राजापेठ ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : काही अज्ञात अतिक्रमणधारकांनी हमालपुरा झोन कार्यालयात मंगळवारी दुपारी तोडफोड केली. तेथे उपस्थित कर्मचाºयांनाही मारहाण केल्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम जोरात सुरू आहे. रस्त्यावर लागणाºया हातगाड्या हटविण्यात येत असताना अतिक्रमणधारक हुज्जत घालत असल्याचे प्रकार दररोजच घडतात. मंगळवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दस्तुरनगर परिसरातील अतिक्रमण हटवून तेथील अतिक्रमणधारकांच्या काही हातगाड्या जप्त केल्या होत्या. यावेळी अतिक्रमणधाराकांचा विरोध अधिकाऱ्यांना सहन करावा लागला. मात्र, काही अज्ञात अतिक्रमणधारकांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हमालपुऱ्यातील महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागात धडक देऊन अचानक कार्यालयात फेकफाक सूरू करून खुर्च्या-टेबलांची तोडफोड केली. हा गोंधळ बघून निरीक्षक प्रविण इंगोले, शिपाई विलास खोरपडे व वाहन चालक राजेश गवाने यांनी तोडफोड करणाºयांना मज्जाव केला. मात्र, अतिक्रमणधारक त्यांच्याही अंगावर मारहाण करण्यास धावून आले. कार्यालयातील नासधूस केल्यानंतर त्या अज्ञातानाही बाहेरच्या पार्कींगमध्ये उभे असणाऱ्या दुचाकींची तोडफोड केली. या घटनेची तक्रार पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.

Web Title: Beat up municipal corporation employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.