सावधान! मोबाईलचा विरंगुळा ठरतोय विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:33 PM2018-11-27T13:33:13+5:302018-11-27T13:38:03+5:30

अभ्यास करताना विरंगुळा म्हणून १० ते २० मिनिटे मोबाईल हाताळत असाल, तर आयुष्याच्या टर्निंग पॉइंटसाठी हे घातक ठरणार आहे.

Be careful! Fearful of mobile students is dangerous due to the percentage of students | सावधान! मोबाईलचा विरंगुळा ठरतोय विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घातक

सावधान! मोबाईलचा विरंगुळा ठरतोय विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घातक

Next
ठळक मुद्देतयारी दहावी-बारावीची टक्केवारीत घट झाल्याचा निष्कर्ष

मोहन राऊत
अमरावती: अभ्यास करताना विरंगुळा म्हणून १० ते २० मिनिटे मोबाईल हाताळत असाल, तर आयुष्याच्या टर्निंग पॉइंटसाठी हे घातक ठरणार आहे. हा मोह टाळून आगामी दोन महिने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवतोड मेहनत घ्यावी लागणार असल्याचा सूर बहुतांश पालकांमधून पुढे आला. याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये टक्केवारीत घट होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
निमित्त होते धामणगाव रेल्वेमधील आदर्श महाविद्यालयात आयोजित परिसंवादाचे. दररोज दिवस व रात्री अभ्यासादरम्यान विरंगुळा म्हणून दहा ते वीस मिनिटे अवधी मोबाइलचा वापर विद्यार्थ्यांकडून होतो. यामध्ये अधिकाधिक वेळ निघून जात असल्याचे परिसंवादात पुढे आले. यंदा बारावीत असलेले विद्यार्थी कधीपासून मोबाइल हाताळतात, असा प्रश्न पालकांना करण्यात आला असता, काही विद्यार्थी इयत्ता आठवीपासून, तर काही नववीपासून मोबाइल बाळगत असल्याचे पुढे आले. बहुतांश पालकांनी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या पाल्याला मोबाईल घेऊन दिल्याचे सांगितले.
यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेची तयारी शिक्षक व पालक वर्ग विद्यार्थ्या$ंकडून करून घेतली जात आहे.

टक्केवारीत घट
जे विद्यार्थी मोबाईल हाताळतात, ते दहावीमध्ये यशस्वी ठरले तरी ते यश व टक्केवारी बारावीच्या परीक्षेत टिकून राहत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे दहावी ते बारावीदरम्यान वाढत्या वयानुसार मोबाइलचा वापर अधिक प्रमाणात होतो. गुगलमधून काही पॉइंट सर्च करण्यासाठी पाल्य पालकांकडे मोबाइलचा हट्ट धरतो. अकरावीत घेतलेला मोबाइल बारावीच्या परीक्षेपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या जीवनाचा घटक बनतो. या मोबाइलमुळे दहावीत असलेली टक्केवारी बारावीच्या परीक्षेत टिकत नाही, ही बाब परिसंवादातून पुढे आली.

आजारांमध्ये वाढ
मोबाइलचा अधिक वापर केल्याने आणि काही विशिष्ट पद्धतीने वापर केल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, एकाग्रता कमी होणे, नवीन शिकण्याची क्षमता कमी होणे, ग्रहणशक्ती कमी होणे, थकवा येणे, चक्कर येणे, मळमळणे तसेच पोट बिघडण्याचीही शक्यता हे परिणाम प्रामुख्याने दिसून येतात.

अल्झायमर, मोतीबिंदू
बारा वर्षांवरील मुलांना मोबाइलवर अधिक प्रमाणात गेम्स खेळण्याच्या परिणामी अल्झायमरसारख्या आजारांचाही सामना लागू शकतो. विद्युत चुंबकीय लहरी सतत कानाच्या आसपास पोहोचत असल्याने केवळ कानच नाही, तर आसपासच्या अन्य पेशींवरही परिणाम होतो. तीव्र चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांमध्ये जळजळ व मोतीबिंदूसारखे विकाराचे रुग्ण अमरावती शहरात उपचार घेत असल्याचा सूरदेखील परिसंवादातून निघाला.

दहावी व बारावीत असताना मोबाइल वापरू नये. महत्त्वाचे काम असल्यास साधा मोबाइल वापरावा. मोबाइलच्या हव्यासामुळे परीक्षेत टक्केवारी घटत असल्याचा सूर परिसंवादातून पुढे आला आहे.
डॉ. वाय.बी. गांडोळे
प्राचार्य, आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे

Web Title: Be careful! Fearful of mobile students is dangerous due to the percentage of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.