Amravati: रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले, तीन जणांचा मृत्यू, सहा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 09:21 AM2023-10-02T09:21:42+5:302023-10-02T12:33:39+5:30

Amravati: रस्त्याच्या कामासाठी मेळघाटातून गेलेल्या आदिवासी मजुरांना एका ट्रक झोपलेले असतानाच चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी ५.३० वाजता घडली. हा अपघात बुलढाणा तालुक्यातील मलकापूर ते नांदुरा रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर  घडला. 

Amravati: Three dead, six injured as truck crushes laborers sleeping on roadside | Amravati: रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले, तीन जणांचा मृत्यू, सहा जखमी

Amravati: रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले, तीन जणांचा मृत्यू, सहा जखमी

googlenewsNext

- नरेंद्र जावरे
अमरावती - रस्त्याच्या कामासाठी मेळघाटातून गेलेल्या आदिवासी मजुरांना एका ट्रक झोपलेले असतानाच चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी ५.३० वाजता घडली. हा अपघात बुलढाणा तालुक्यातील मलकापूर ते नांदुरा रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर  घडला. 

मोरगड तालुका चिखलदरा येथील १० मजुर रस्त्यावर काम करण्यासाठी नांदुरा येथे गेले होते. महामार्गाच्या बाजूला झोपडीत झोपले असतांना सकाळी ५.३० वाजता  PB-11/CZ 4047 या आयशर वाहनाच्या चालकाने बेतरकार पणे गाडी चालवित वडणेर भुलजी MH-6 गावाजवळ मजुरांच्या झोपडीवर गाडी चालवित अपघात घडवला.  या अपघातात झोपडीत झोपलेले प्रकाश बाबु जांभेकर (२६ वर्ष), पंकज तुळशीराम जांभेकर  यांचा जागीच मृत्यू झाला. अभिषेक रमेश जांभेकर (१८) वर्ष याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर दिपक खोजी बेलसरे (२५ वर्ष), राजा दादु जांभेकर (३५ वर्ष) यांचेवर मलकापूर येथे शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल साहेब यांनी बुलढाणा येथे सम्पर्क करून माहिती जाणून घेतली. अपघात ग्रस्तांना मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

ट्रक चालकाने आदिवासी मजुरांना चिडल्याची घटना घडली. यात तिघे ठार तर दोघे गंभीर जखमी आहे. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आपण घटनास्थळी आहोत पुढील तपास सुरू आहे
- अनिल बेहराणी
(ठाणेदार नांदुर बुलढाणा) 

Web Title: Amravati: Three dead, six injured as truck crushes laborers sleeping on roadside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.