बाप-लेकरांच्या भेटीने गहिवरले अमरावती कारागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:55 PM2018-07-14T21:55:39+5:302018-07-14T21:56:00+5:30

जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना शनिवारी सकाळी गळाभेट कार्यक्रमात त्यांच्या मुलामुलींसह वडील, आई, आजोबांची भेट घडवून आणल्याने कारागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आप्तांना पाहताच अनेक बंद्यांनी अश्रूंना वाट मोकळी केली. आप्तांनीही पुढच्या भेटीची अपेक्षा व्यक्त करीत जड अंत:करणाने कारागृहातून निरोप घेतला.

Amravati Jail, which was filled with father-daughter visits | बाप-लेकरांच्या भेटीने गहिवरले अमरावती कारागृह

बाप-लेकरांच्या भेटीने गहिवरले अमरावती कारागृह

googlenewsNext
ठळक मुद्देपाषाणाला मायेचा पाझर : गळाभेटीनंतर कैद्यांसह आप्तांचे डोळे पाणावले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना शनिवारी सकाळी गळाभेट कार्यक्रमात त्यांच्या मुलामुलींसह वडील, आई, आजोबांची भेट घडवून आणल्याने कारागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आप्तांना पाहताच अनेक बंद्यांनी अश्रूंना वाट मोकळी केली. आप्तांनीही पुढच्या भेटीची अपेक्षा व्यक्त करीत जड अंत:करणाने कारागृहातून निरोप घेतला.
अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कैद्यांनाही आपल्या मुलांना भेटता यावे, यासाठी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी ‘गळाभेट’ उपक्रम पुरुष व महिला बंद्यांकरिता सुरू केला. बंदीजन व त्यांच्या आप्तांना शनिवारी या उपक्रमादरम्यान काही काळ मुक्त वातावरणात घालवता आले. मुलांनी कारागृहात कैद आई वा बापाची विचारपूस केली, तर कैद्यांनीही आप्तांशी गळाभेट देत घराकडील ख्यालीखुशाली विचारली. या उपक्रमाबद्दल कैद्यांनी कारागृह प्रशासनाचे आभार मानले.
कारागृह प्रशासनातर्फे देण्यात आलेला खाऊ कैद्यांनी मुलांना दिला. यावेळी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, पांडुरंग भुसारी, सुनील पाटील, कदम, चव्हाण आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अखेरच्या सत्रात कारागृहातर्फे कैद्यांच्या आप्तांकरिता गोडधोड जेवणाचे आयोजन करण्यात आले.

Web Title: Amravati Jail, which was filled with father-daughter visits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.