जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थावर १३८७ पोलिसांचा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 07:39 PM2018-01-10T19:39:17+5:302018-01-10T19:41:11+5:30

राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थावर यंदा मोठ्या संख्येने मराठा बांधव हजेरी लावणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक व्हीआईपी कार्याक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अमरावती परीक्षेत्रातून १ हजार ३८७ पोलीस कर्मचा-यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

1387 police settlement on Matru Dhur for Jijau Janmotsav | जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थावर १३८७ पोलिसांचा बंदोबस्त

जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थावर १३८७ पोलिसांचा बंदोबस्त

Next

 अमरावती - राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थावर यंदा मोठ्या संख्येने मराठा बांधव हजेरी लावणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक व्हीआईपी कार्याक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अमरावती परीक्षेत्रातून १ हजार ३८७ पोलीस कर्मचा-यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात आयपीएस दर्जाच्या अधिकाºयांपासून तर शिपायांचा समावेश आहे. राज्य सरकारने यंदाच्या राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाकडे विशेष लक्ष दिले आहे. 

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे दरवर्षी १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जन्मदिनी लाखो मराठा व बहुजन बांधव हजेरी लावतात. मराठा सेवा संघाने २५ वर्षांपासून जिजाऊ जन्मोत्सव सुरू केल्यामुळे सिंदखेडराजा हे लाखो बहुजनांचे प्रेरणास्थान ठरले आहे. दरवर्षी येणाºयांची गर्दी वाढतच आहे. यावर्षी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह कोल्हापूरचे संभाजीराजे, सातारचे उदयनराजे व तंजावरचे बाबाजी भोसले हे प्रमुख पाहुणे आहेत. यासह अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. नुकताच घडलेल्या कोरेगाव-भीमाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा येथेसुध्दा प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरवर्षी बुलडाणा जिल्ह्यातीलच पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तात असायचे. यावर्षी ५ ते ६ लाख लोक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. अमरावती पोलीस परिक्षेत्रातील अकोला, वाशिम, अमरावती ग्रामीण, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यासह पोलीस विभागाचे १३८७ अधिकारी व कर्मचारी हजर राहणार आहे.

अमरावती परिक्षत्रातील मिळणारा बंदोबस्त 
जिल्ह्या        पोनि    सपोनि/पोउपनि    पोकर्म
अकोला    ०३    १०          ७५
अमरावती ग्रा.    ०४     १५        १००
यवतमाळ     ०४     १५         १००
वाशिम     ०२    ०८          २५
एकूण                    १३     ४८          ३००

बुलडाणा जिल्ह्यातील १ हजार २४ अधिकारी व कर्मचारी बंदोबस्ताकरिता हजर राहणार आहेत. तसेच अन्य जिल्ह्यांतील ३६३ पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच एक आरसीपी पथक, एक दंगा नियंत्रण पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

ड्रोन कॅमेरयाची नजर 
राजमाता जिजाऊ जन्मस्थळावर दर्शन घेण्यासाठी येणाºया समूहाच्या हालचालीवर तसेच गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सिंदखेडराजा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ड्रोन कॅमेरयाची व्यवस्था  केली आहे.

Web Title: 1387 police settlement on Matru Dhur for Jijau Janmotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.