४० हजारांच्या कमिशनसाठी अडकला युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:34 AM2017-08-01T02:34:47+5:302017-08-01T02:35:39+5:30

अकोला: चलनातून बंद झालेल्या एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांचे तब्बल २० लाख रुपये घेऊन जुने शहरात जात असलेल्या युवकाला नोटा पोहोचविण्यासाठी ४० हजार रुपयांचे कमिशन देण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Youth arrested for 40 thousand commissions | ४० हजारांच्या कमिशनसाठी अडकला युवक

४० हजारांच्या कमिशनसाठी अडकला युवक

googlenewsNext
ठळक मुद्देचलनातून बाद नोटांचे जप्ती प्रकरण२0 लाखांसाठी मिळणार होते अडीच लाखमोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: चलनातून बंद झालेल्या एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांचे तब्बल २० लाख रुपये घेऊन जुने शहरात जात असलेल्या युवकाला नोटा पोहोचविण्यासाठी ४० हजार रुपयांचे कमिशन देण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ४० हजारांच्या लालसेपोटी सदर युवक कारवाईच्या फेºयात अडकला असून, ही रक्कम कुणाची आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत.
कौलखेड येथील रहिवासी राकेश अशोकराव तोहगावकर हा कापडाचा व्यावसायिक असून, तो रविवारी सकाळी ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या म्हणजेच चलनातून बंद झालेल्या नोटांचे तब्बल २० लाख रुपये घेऊन जुने शहरात जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने त्याला खोलेश्वर परिसरात पकडले होते. त्यानंतर सदर युवकाविरुद्ध क ारवाई करीत हे प्रकरण आयकर विभागाकडे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या तपासात राकेश हा नागपूरमधील निखिलेश नामक युवकाच्या माध्यमातून रिजवान ऊर्फ गुड्डू याच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. गुड्डूच्या माध्यमातून ही रक्कम बदलण्यात येत असल्याची शक्यता आता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणात २० लाख रुपयांची रक्कम राकेशला नागपूर येथे पोहोचवायची होती. या मोबदल्यात त्याला ४० हजार रुपयांचे कमिशन देण्यात येत होते, तर २० लाखांच्या मोबदल्यात केवळ २ लाख ६० हजार रुपये नागपूरमधून नवीन नोटा मिळणार असल्याची माहिती आहे; मात्र स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४० हजारांच्या कमिशनसाठी राकेश पोलिसांच्या कारवाईत सापडला असून, त्याच्या माध्यमातून रिजवान ऊर्फ गुड्डू आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
राकेशच्या संपर्कात नागपूरमधील निखिलेश आणि रिजवान यांच्यासह आणखी काही जण होते, असा कयास पोलिसांचा आहे, त्यामुळे राकेश व त्याच्या संपर्कातील युवकांची चौकशी केल्यास यामध्ये नोटा बदलणारे मोठे रॅकेटच उघड होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Youth arrested for 40 thousand commissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.