पाण्याची पातळी घसरली; अकोला जिल्ह्यातील १५ हजारावर हेक्टरवरील फळबागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 05:19 PM2018-03-09T17:19:12+5:302018-03-09T17:19:12+5:30

अकोला : जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात पाणी आटण्याच्या मार्गावर असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत.

Water level dropped; froot crops in danger in Akola district | पाण्याची पातळी घसरली; अकोला जिल्ह्यातील १५ हजारावर हेक्टरवरील फळबागा धोक्यात

पाण्याची पातळी घसरली; अकोला जिल्ह्यातील १५ हजारावर हेक्टरवरील फळबागा धोक्यात

Next
ठळक मुद्देजमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नसल्याने विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत. परप्रांतात जाणारा येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे.

अकोला : जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात पाणी आटण्याच्या मार्गावर असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत. दरम्यान, पाणीटंचाईने नागरिकांची होरपळ सुुरू आहे.
मागील वर्षी चांगला पाऊस पूरक न झाल्याने धरणे, धरणात पूरक जजसाठा संचयित झाला नाही. त्यामुळे जमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नसल्याने विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. या सर्व परिस्थितीची झळ यावर्षी भाजीपाला व फळ बागायतदार शेतकºयांना सोसावी लागत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक साडे तीन हजार हेक्टरवर संत्रा आहे. दुसºया क्रमांकावर २३०० हेक्टरच्यावर लिंबू असून, केळी २२५० हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५०, चिकू ७५, सीताफळ ७५,आवळा ९० तर आंबा ६२५ हेक्टर आहे. मागील दोन वर्षात शेतकºयांनी फळ पिकाचे क्षेत्र वाढविले आहे; परंतु उद्भवणाºया पाणीटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील लिंबाची देशभरात ओळख आहे. परप्रांतात जाणारा येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे.
 

भीषण दुष्काळाचा सामना
एकीकडे गावागावांतील शेतकरी भीषण दुष्काळाने हवालदिल झाला आहे. उपलब्ध पाणी ठिबक सिंचनाद्वारे फळबागांना देऊन बागा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. असे असताना अन्न आणि पाण्याच्या शोधात निघालेली रानडुकरे आणि नीलगायी धुमाकूळ घालत फळबागा,भाजीपाल्याचे नुकसान करीत आहे. बाग जगवणे हे सर्वात मोठे आव्हान आमच्या समोर असते. बाग जळाली की, आम्ही काय करावे, संसाराचा गाडा कसा चालवावा हा प्रश्न आम्हाला सतावतो अशा प्रतीक्रीया शेतकºयांमधून उमटत आहेत.
 

 पाण्याच्या टाक्यांना कुलपे
जिल्हयात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मैलोगंती पायपीट सुरू आहे. जे काही पाणी उपलब्ध होते ते पाणी प्लॅस्टीकच्या टाकीमध्ये साठवून त्याला कुलपे लावली जात आहेत. खारपाण पट्टयातील चित्र विदारक आहे. माणसं पाणी मिळवतात पण मुक्या जनावरांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे. गुरांना पाणी मिळत नसल्याने शेतकºयांनी गुरे विक्रीचा सपाटा लावला आहे.

 

Web Title: Water level dropped; froot crops in danger in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.