VIDEO : अकोल्यात चालतीफिरती रसवंती

By Admin | Published: March 10, 2017 05:52 PM2017-03-10T17:52:50+5:302017-03-10T17:52:50+5:30

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 10 -  कडाक्याच्या उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना थंड व ताजा उसाच्या रसा ग्लास स्वतःहून ...

VIDEO: Moving to Akola | VIDEO : अकोल्यात चालतीफिरती रसवंती

VIDEO : अकोल्यात चालतीफिरती रसवंती

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 10 -  कडाक्याच्या उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना थंड व ताजा उसाच्या रसा ग्लास स्वतःहून आपल्याकडे चालत आला तर, कोणीही नाही म्हणणार नाही. सध्या अकोलेकर हे सुख अनुभवत आहेत. कारण अकोल्यामध्ये चालतीफिरती रसवंती त्यांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे.  शहरातील राजस्थानी लोकांच्या चालत्या-फिरत्या रसवंतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
 
चारचाकी वाहनावर रस काढण्याची मशिन बसवलेली आहे. तसेच 8 अश्वशक्तीचे डिझेलवर चालणारे इंजिनही बसवण्यात आले आहे. हे इंजिन रस काढण्याची मशिन व वाहनाला पुढे लोटणे हे दोन्ही काम करते. एका सुकाणू चाकाद्वारे रसवंती चालक वाहनावर नियंत्रण ठेवतो. 
 
साधारणपणे दिवसभरात या इंजिनला अंदाजे दीडशे रुपयांचे डिझेल लागते. एक रसवंती चालक दिवसभरात सुमारे दीडशे ते दोनशे ग्लास रसाची विक्री करतो.  यातून दिवसाकाठी खर्च वजा जाता १५०० रुपये शिल्लक राहतात, असे एका रसवंती चालकाने सांगितले. शहरात अशाप्रकारचे सात ते आठ गाड्या आहेत.
 

https://www.dailymotion.com/video/x844ven

Web Title: VIDEO: Moving to Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.