अकोला जिल्ह्यात कृषी विभागातील ६० च्यावर पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 01:39 PM2019-03-27T13:39:20+5:302019-03-27T13:39:24+5:30

अकोला: जिल्ह्यातील कृषी विभागातील ६० च्यावर पदे रिक्त असून, यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह इतर प्रमुख पदे खाली आहेत.

Vacancy of 60 posts in Agriculture Department in Akola district | अकोला जिल्ह्यात कृषी विभागातील ६० च्यावर पदे रिक्त

अकोला जिल्ह्यात कृषी विभागातील ६० च्यावर पदे रिक्त

Next


अकोला: जिल्ह्यातील कृषी विभागातील ६० च्यावर पदे रिक्त असून, यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह इतर प्रमुख पदे खाली आहेत. विशेष म्हणजे, लेखा अधिकाऱ्यांचे पदही रिक्त असल्याने शेतकºयांसाठी राबविण्यात येणाºया अनेक योजनांचा पैसा परत जाण्याच्या मार्गावर आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा प्रकल्प संचालक आत्मा, दोन जिल्हा उपसंचालक आत्मा, चार सहायक अधीक्षक, लेखाधिकाºयांचे महत्त्वाचे पद रिक्त आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र एक प्रशासकीय अधिकाºयाचे पद रिक्त आहे. बाळापूर तालुका कृषी अधिकाºयाचे पद तर सात-आठ वर्षांपासून रिक्त आहे, तसेच दोन मंडळ अधिकारीही नाहीत. अकोट तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकाºयाचे पद रिक्त आहे. येथीलच कार्यालयीन कृषी अधिकारीच नाही. अकोला तालुक्यात दोन मंडळ कृषी अधिकारी, तेल्हारा तालुक्यातील एक मंडळ अधिकाºयाचे पद रिक्त आहे, तसेच पातूर दोन, मूर्तिजापूर दोन, येथेच एक आत्मा तंत्र पर्यवेक्षकाचे पद रिक्त आहे. याशिवाय २५ च्यावर कृषी सहायक, १० कृषी पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. अकोल्यात लेखाधिकाºयांचे महत्त्वाचे पद रिक्त आहे. आतापर्यंत कंत्राटी लेखाधिकाºयांनी काम बघितले. लेखाधिकारी नसल्याने अनेक योजनांचा पैसा काढणे व त्याचा हिशेब ठेवणे कठीण झाले आहे.
अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यासंबंधी व अनेक योजना शेतकºयांसाठी राबविण्यात येत आहेत. तथापि, जिल्ह्यातील कृषी विभागाची मुख्य पदेच रिक्त आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांची दोन महिन्यांपूर्वी येथून बदली झाली; पण त्यांच्या जागा अद्याप भरलेल्या नाहीत. ज्यांची येथे बदली करण्यात आली, ते अजून रुजू झाले नाहीत. आत्माचे संचालक, उपसंचालक नाहीत. यांतर्गत जिल्ह्यात शेकडो शेतकरी बचत गट, शेतकरी कंपन्या नोंदणी झाली आहे. कंपन्या, गटाच्या शेतकरी संचालकांना अनेक तांत्रिक बाबींची माहितीची गरज असते. तथापि, त्यांना माहिती देणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बाळापूर तालुक्याला कायमस्वरू पी तालुका कृषी अधिकारी नाही. अनेक ठिकाणी प्रभारीवर काम सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त ठेवून जिल्हा व जिल्ह्यातील शेतकरी वाºयावर सोडण्यामागचे कारण काय, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

- जिल्ह्यात पदे रिक्त आहेत. अकोला तालुक्यातही सहा कृषी सहायक, तीन पर्यवेक्षक, दोन मंडळ अधिकारी नाहीत. असे असले तरी काम करावेच लागणार आहे. ते आम्ही जोरात करीत आहोत.
नरेंद्र शास्त्री,
कृषी अधिकारी,
अकोला.

 

 

 

Web Title: Vacancy of 60 posts in Agriculture Department in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.