घरे, विद्युत पोलवर अनधिकृत फायबर आॅप्टीक केबलचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:22 PM2018-08-03T13:22:31+5:302018-08-03T13:24:49+5:30

अकोला : शहरात महावितरणच्या विद्युत पोलसह काही नागरिकांच्या घरांवर अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला.

 Unauthorized fiber optic cable network on homes, electric poles | घरे, विद्युत पोलवर अनधिकृत फायबर आॅप्टीक केबलचे जाळे

घरे, विद्युत पोलवर अनधिकृत फायबर आॅप्टीक केबलचे जाळे

googlenewsNext
ठळक मुद्देफायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याची तक्रार भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी प्रशासनाकडे केली.मनपाच्या अतिक्रमण विभागासह विद्युत विभागाने गुरुवारी भारत विद्यालयाजवळ सुरू असणाºया अनधिकृत केबलचे कामकाज तातडीने बंद केले. या प्रकरणी फोर-जी केबलचे जाळे टाकणाऱ्या रिलायन्स कंपनीने हात वर केल्याची माहिती आहे.

अकोला : शहरात महावितरणच्या विद्युत पोलसह काही नागरिकांच्या घरांवर अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. महापालिका प्रशासनाने सदर केबलचे जाळे जप्त करण्याची कारवाई केली असून, या प्रकरणी फोर-जी केबलचे जाळे टाकणाऱ्या रिलायन्स कंपनीने हात वर केल्याची माहिती आहे.
महावितरण कंपनीचे विद्युत पोल, मनपाचे पथदिवे असणारे खांब तसेच काही नागरिकांच्या इमारतींवर रिलायन्स कंपनीकडून अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याची तक्रार भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी प्रशासनाकडे केली. नगरसेविका देव यांच्या पत्राची दखल घेत मनपाच्या अतिक्रमण विभागासह विद्युत विभागाने गुरुवारी भारत विद्यालयाजवळ सुरू असणाºया अनधिकृत केबलचे कामकाज तातडीने बंद केले. यावेळी केबल टाकणाºया काही इसमांनी मनपाच्या कर्मचाºयांवर अरेरावी केल्याचा प्रकार दिसून आला. त्यांच्या अरेरावीला न जुमानता मनपा कर्मचाºयांनी केबल जप्त करण्याची कारवाई केली.

खासगी व्हेंडरची मनमानी
नागरिकांच्या घरापर्यंत फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकण्याचे काम शहरातील अग्रवाल व मित्तल नामक खासगी व्हेंडरने घेतल्याची माहिती आहे. सदर केबलचे जाळे टाकण्यासाठी मनपासह महावितरण कंपनीची परवानगी आवश्यक असून, या दोन्ही यंत्रणांची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. सदर व्हेंडर कोण्या कंपनीसाठी केबलचे जाळे टाकत आहेत, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर मनपाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी तक्रार करावी, अशी मागणी समोर आली आहे.


रिलायन्सचा सात हजार पोलचा प्रस्ताव
शहरात फोर-जी सुविधेसाठी केबलचे जाळे टाकणाºया रिलायन्स इन्फोकॉम कंपनीने २० दिवसांपूर्वी मनपाकडे सात हजार पोल उभारण्याचा प्रस् ताव सादर केल्याची माहिती आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५४० पोल उभारल्या जातील. त्या पोलच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत फायबर केबलचे जाळे टाकण्यात येणार आहे. सदर पोलचा मनपाकडून एलईडी पथदिव्यांसाठी वापर केला जाणार आहे. या पोलच्या मोबदल्यात मनपाला महिन्याकाठी आर्थिक स्वरूपात भाडे दिल्या जाणार असल्याची माहिती आहे.


शहरात अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी केबल जप्त करण्यात आले असून, संबंधित खासगी व्हेंडरवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
-जितेंद्र वाघ आयुक्त, मनपा

 

Web Title:  Unauthorized fiber optic cable network on homes, electric poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.