राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक कारवर कोसळला; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 04:53 PM2019-04-14T16:53:04+5:302019-04-14T16:53:06+5:30

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक विरुद्ध दिशेने येत असलेल्या कार वर कोसळला. रविवारी दुपारी मुर्तीजापूर तालुक्यातील अनभोरा गावाजवळ झालेल्या या अपघातात सुदैवाने या प्राणहानी टळली. ए

Truck collapses on national highway; One injured | राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक कारवर कोसळला; एक जखमी

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक कारवर कोसळला; एक जखमी

Next

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक विरुद्ध दिशेने येत असलेल्या कार वर कोसळला. रविवारी दुपारी मुर्तीजापूर तालुक्यातील अनभोरा गावाजवळ झालेल्या या अपघातात सुदैवाने या प्राणहानी टळली. एका परिवारातील दोन कार ओव्हरटेक करीत असताना झालेल्या या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला.
रविवारी दुपारी १:३० वाजताचे दरम्यान ट्रक क्रमांक एम एच ०४ जे के ८६६२ अकोल्याकडे जात असताना एकाच परिवारातील दोन कार नागपूरच्या दिशेने जात होत्या. दोन्ही कार एकमेकांना ओव्हरटेक करीत असताना समोर निघुन जाणाऱ्या कारचा धक्का ट्रकला लाकल्याने ट्रक चालकाचे वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक मागच्या एम एच ४० ए आर ४०९० क्रमांकाच्या कारवर जाऊन कोसळला. या मध्ये कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. सुदैवाने कारमधील चार प्रवाशी थोडक्यात बचावले. त्यात दोन बालकांचा समावेश होता. एक व्यक्ति किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी व्यक्तिला मूर्तिजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रहदारी सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Truck collapses on national highway; One injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.