सट्टा खेळणाऱ्या बुकींची मध्यस्थी करणारे तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:08 PM2019-04-05T16:08:42+5:302019-04-05T16:08:50+5:30

अकोला : आयपीएल क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या बुकींची मध्यस्थी करणाºया अकोल्यातील तीन व्यापाऱ्यांना पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुबन येथून गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.

Three people interfering with speculative bookies arested in akola | सट्टा खेळणाऱ्या बुकींची मध्यस्थी करणारे तिघे ताब्यात

सट्टा खेळणाऱ्या बुकींची मध्यस्थी करणारे तिघे ताब्यात

Next

अकोला : आयपीएल क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या बुकींची मध्यस्थी करणाºया अकोल्यातील तीन व्यापाऱ्यांना पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुबन येथून गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.
मधुबन वाइन बार तथा हॉटेल येथून तीन व्यापारी आयपीएल सिरीजमधील दिल्ली कॅपिटल आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघात गुरुवारी सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर तीन व्यापारी बुकींची आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थी करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीचा आधारे पथकाने मधुबन येथे पाळत ठेवून सदर तिन्ही व्यापाºयांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाइल जप्त करण्यात आले असून, हे व्यापारी कोणत्या बुकींच्या संपर्कात होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार फोफावला असून, पोलिसांकडून मात्र प्रथमच किरकोळ कारवाई करण्यात आली.
पाच मोबाइल टीव्ही सेटअप बॉक्स जप्त
पोलिसांनी ऋषभ पटेल रा. नवरंग सोसायटी, दीपक खत्री आणि मयंक अग्रवाल दोघेही राहणार राधाकिसन प्लॉट अकोला या तीन व्यापाºयांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच मोबाइल एक टीव्ही आणि सेटअप बॉक्स जप्त केला. या तीन व्यापाºयांची कसून चौकशी करण्यात येत असून, त्यांच्याकडून काही बुकींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Three people interfering with speculative bookies arested in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.