क्षयरुग्णांना सकस आहारासाठी मिळणार ५०० रुपये अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:58 PM2018-05-10T13:58:11+5:302018-05-10T13:58:11+5:30

अकोला: सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व क्षयरुग्णांकरिता निक्षय पोषण योजना भारत सरकारद्वारे १ एप्रिल २०१८ पासून सुरू करण्यात आली असून, या योजनेंतर्गत प्रत्यक्ष क्षयरुग्णास पोषण आहारासाठी दरमहा ५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

TB pataients will get subsidy of 500 rupees for healthy diet |  क्षयरुग्णांना सकस आहारासाठी मिळणार ५०० रुपये अर्थसहाय्य

 क्षयरुग्णांना सकस आहारासाठी मिळणार ५०० रुपये अर्थसहाय्य

Next
ठळक मुद्देनव्याने निघालेल्या क्षयरुग्णांना ६ महिने, या आधी उपचार घेतलेल्या रुग्णांस ८ महिने व एमडीआर क्षयरुग्णांना २४ महिने पोषण आहाराकरिता ५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश गाव, शहर, तालुका, जिल्हा व देश क्षयमुक्त करण्याची संकल्पना साध्य करण्याचा आहे.याकरिता प्रत्येक क्षयरुग्णांनी आपले आधारकार्ड व बँकेची संपूर्ण माहिती आपल्या जवळच्या प्रा.आ. केंद्रात सादर करणे आवश्यक आहे.

अकोला: सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व क्षयरुग्णांकरिता निक्षय पोषण योजना भारत सरकारद्वारे १ एप्रिल २०१८ पासून सुरू करण्यात आली असून, या योजनेंतर्गत प्रत्यक्ष क्षयरुग्णास पोषण आहारासाठी दरमहा ५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. १ एप्रिल २०१८ नंतर निघणाऱ्या प्रत्येक क्षयरुग्णांना या योजनेचा लाभ घेता येईल.
या योजनेंतर्गत १ एप्रिलला औषधोपचार घेत असलेले क्षयरुग्ण तसेच १ एप्रिलनंतर निघालेल्या सर्व क्षयरुग्णांना पोषण आहाराकरिता ५०० रु. प्रतिमहिना (दरमहा) औषध सुरू असेपर्यंत मिळणार आहे. म्हणजेच नव्याने निघालेल्या क्षयरुग्णांना ६ महिने, या आधी उपचार घेतलेल्या रुग्णांस ८ महिने व एमडीआर क्षयरुग्णांना २४ महिने पोषण आहाराकरिता ५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. ही रक्कम आॅनलाइन पद्धतीने थेट क्षयरुग्णांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. याकरिता प्रत्येक क्षयरुग्णांनी आपले आधारकार्ड व बँकेची संपूर्ण माहिती आपल्या जवळच्या प्रा.आ. केंद्रात सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गाव, शहर, तालुका, जिल्हा व देश क्षयमुक्त करण्याची संकल्पना साध्य करण्याचा आहे. क्षयरुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्याकरिता औषधोपचारासोबतच त्यांना सकस आहराची नितांत गरज असते. त्याकरिता केंद्र्र शासन १ एप्रिल २०१८ पासून क्षयरुग्णांकरिता निक्षय पोषण योजनेंतर्गत अर्थसहाय्य म्हणून दरमहा ५०० रु. क्षयरुग्णांना देण्यात येणार आहेत. या योजनेद्वारे (ट्रिटमेंटर सर्पोटर) क्षयरुग्णांना औषधोपचार देणाºयांना क्षयरुग्णांचा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर प्रती क्षयरुग्ण १००० व एमडीआर क्षयरुग्णांचा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर ५००० रु. प्रती रुग्ण याप्रमाणे योजनेचा लाभ मिळणार आहे.


खासगी वैद्यकीय व्यावसायिक मिळणार फायदा
खासगी डॉक्टरांकडे निघणाºया क्षयरुग्णांची माहिती त्यांनी शासनास कळविणे आवश्यक आहे. क्षयरोग हा ७ मे २०१८ चे शासन आदेशाद्वारे ‘नोटीफाय डिसीस’ जाहीर झालेला आहे. त्याद्वारे प्रत्येक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे तसेच खासगी लॅब, मल्टीहॉस्पिटलमध्ये निघणाºया क्षयरुग्णांची माहिती नोटीफिकेशन फॉरमॅटमध्ये आरोग्य खात्यास (जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास) देणे बंधनकारक आहे. नोटीफाय फॉरमॅटमध्ये क्षयरुग्णांची माहिती सादर झाल्यानंतर प्रती क्षयरुग्ण ५०० प्रमाणे तसेच क्षयरुग्णांचा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर प्रती क्षयरुग्ण ५०० प्रमाणे खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांना दिले जाईल. यासाठी क्षयरुग्ण नोटीफाय करणाºया डॉक्टरांनी आपले आधार नंबर व बँकेचा तपशील जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय अकोला यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

शासनाद्वारे क्षयमुक्त भारत अभियान सुरू असून, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त क्षयरुग्णांनी व खासगी डॉक्टरांनी घेऊन क्षयरोगमुक्त अकोला या अभियानात सहभागी व्हावे. - डॉ. मेघा गोळे , जिल्हा क्षयरोग अधिकारी, अकोला.

 

Web Title: TB pataients will get subsidy of 500 rupees for healthy diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.