महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंता निलंबित    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:00 AM2017-10-17T02:00:52+5:302017-10-17T02:03:19+5:30

वाणिज्यीक वीज जोडणी देण्यासाठी एका उप-कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेला महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास सोमवारी निलंबित करण्यात आले. जानोकार याच्यावर सोमवारी सायंकाळी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Suspended bureaucrat executive engineer of MSEDCL | महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंता निलंबित    

महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंता निलंबित    

googlenewsNext
ठळक मुद्देवाणिज्यीक वीज जोडणी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन जानोकार यास सोमवारी निलंबित करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वाणिज्यीक वीज जोडणी देण्यासाठी एका उप-कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेला महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास सोमवारी निलंबित करण्यात आले. जानोकार याच्यावर सोमवारी सायंकाळी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अकोला येथील एका ४२ वर्षीय उप-कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने शुक्रवार,१३ ऑक्टोबर रोजी सापळा रचून जानोकार याला रंगेहात अटक केली होती. अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या गजानन शालीग्राम जानोकार (५५) याने गत महिन्यात ग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार स्वीकारला होता. 
या काळात एका आईस्क्रिम पार्लरसाठी नवीन विद्युत जोडणी देण्यासाठी मंजुरी देण्याकरिता तसेच मागील सात दिवसांत बाळापूर, बाश्रीटाकळी उपविभागातील शेतकर्‍यांच्या कृषी पंपासाठी वीज जोडणीकरिता लागणारे करारपत्र देऊन काम करण्याची परवानगी देण्याकरिता प्रभारी कार्यकारी अभियंता जानोकार याने १0 हजार रुपयांची लाच देण्याची मागणी केल्याची तक्रार सदर उप-कंत्राटदाराने ‘एसीबी’कडे केली होती.  सदर तक्रारीवरून एसीबीने सापळा लावून जानोकार याला अटक केली होती. त्यानंतर जानोकार निलंबित होणार, हे निश्‍चित होते. अखेर सोमवारी जानोकारच्या निलंबनाच्या फाइलवर स्वाक्षरी करण्यात आली.

Web Title: Suspended bureaucrat executive engineer of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा