विद्यार्थ्यांंची अध्ययन संपादणूक तपासण्यासाठी आता राज्यस्तरीय सर्वेक्षण

By Admin | Published: July 13, 2015 01:08 AM2015-07-13T01:08:02+5:302015-07-13T01:08:02+5:30

या शैक्षणिक वर्षात सर्व व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक सर्वेक्षण.

State-level surveys now to examine the study of students' education | विद्यार्थ्यांंची अध्ययन संपादणूक तपासण्यासाठी आता राज्यस्तरीय सर्वेक्षण

विद्यार्थ्यांंची अध्ययन संपादणूक तपासण्यासाठी आता राज्यस्तरीय सर्वेक्षण

googlenewsNext

खामगाव : विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक पातळी कोणत्या स्तरावर आहे, हे जाणून घेण्यासाठी संपादणूक सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचे आरोग्य तपासण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्लीच्यावतीने सन २00१ पासून इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांंंचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण केले जाते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांची संपादणूक पातळी कोणत्या स्तरावर आहे हे तपासण्यासाठी सन २0१३-१४ मध्ये केवळ मराठी माध्यमातील अनुदानित शाळांमधील इयत्ता पाचवीच्या गणित आणि मराठी या दोन विषयांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले होते. सन २0१४-१५ मध्ये मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांमधील इयत्ता दुसरी, तिसरी, पाचवी आणि आठवीतील मराठी व गणित या दोन विषयांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान, सन २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात सर्व व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक पातळी तपासण्यासाठी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सर्वेक्षणाचे वेळापत्रक लवकरच राज्य शासनाच्यावतीने जाहीर केल्या जाणार आहे.

*अशी आहे सर्वेक्षण समितीची रचना

     महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांची सर्वेक्षण समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे, संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे, संचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, संशोधन व मूल्यमापन तज्ज्ञ यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: State-level surveys now to examine the study of students' education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.