उभे सोयाबीन पिक शेतकर्‍याने केले जमीनदोस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 08:17 PM2017-10-24T20:17:22+5:302017-10-24T20:32:45+5:30

शिर्ला (अकोला): पातूर तालुक्यातील भंडारज बु. च्या शे तकर्‍याला साडेतीन एकरात २0 किलो सोयाबीन झाल्याने २४  ऑक्टोबर रोजी आमदारांच्या उपस्थितीत शेतात रोटाव्हेटर  फिरवून पीक जमीनदोस्त केले.

Soybean Crop Farmer Made Junkyard! | उभे सोयाबीन पिक शेतकर्‍याने केले जमीनदोस्त!

उभे सोयाबीन पिक शेतकर्‍याने केले जमीनदोस्त!

Next
ठळक मुद्देपावसाने फिरवले हिरव्या स्वप्नावर पाणी!साडेतीन एकरात केवळ २0 किलो सोयाबीन!

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला (अकोला): पातूर तालुक्यातील भंडारज बु. च्या शे तकर्‍याला साडेतीन एकरात २0 किलो सोयाबीन झाल्याने २४  ऑक्टोबर रोजी आमदारांच्या उपस्थितीत शेतात रोटाव्हेटर  फिरवून पीक जमीनदोस्त केले.
भंडारज बु. च्या गजानन रामभाऊ ठाकरे यांनी साडेतीन एकर  शेतात सोयाबीनची पेरणी केली होती; मात्र बेभरवशाच्या  पावसाने त्यांच्या हिरव्या स्वप्नावर पाणी फिरवले. साडेतीन  एकरात पेरणीपासून सोंगणीपयर्ंत ६५ हजारांहून अधिक रक्कम   खर्च करून हातात केवळ २0 किलो सोयाबीन उत्पादन झाल्याने  सदर शेतकर्‍याने आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह तालुका  कृषी अधिकारी एस. एम. मकासरे, नायब तहसीलदार नितिन  मडके, मंडळ अधिकारी सागर डोंगरे, महसूल मंडळ अधिकारी  तायडे, कृषी पर्यवेक्षक आर. एम. फुलारी, डिके, तलाठी यांना  २४ ऑक्टोबरला शेतात बोलावले. त्यांना पिकांची विदारक  अवस्था दाखवली. कृषी अधिकार्‍यांनी पीक सर्वेक्षण करून  मूल्यांकन केले. त्यानंतर सदर शेतकर्‍याने २४ ऑक्टोबर रोजी  उभ्या सोयाबीन पिकात रोटाव्हेटर फिरवून पीक जमीनदोस्त  केले.
पातूर तालुक्यातील २७000 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन  लागवड करण्यात आली होती; मात्र उत्पादन कमालीचे  घटल्याने लावलेला खर्च बुडाला आहे. 
 

Web Title: Soybean Crop Farmer Made Junkyard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती