वऱ्हाडात  सोयाबीनच्या भरघोस उत्पादनाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 06:07 PM2018-07-31T18:07:48+5:302018-07-31T18:10:06+5:30

Soyabean production likely to grow in vidarbha | वऱ्हाडात  सोयाबीनच्या भरघोस उत्पादनाची शक्यता!

वऱ्हाडात  सोयाबीनच्या भरघोस उत्पादनाची शक्यता!

Next
ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ५९१ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली. अकोला जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ४१२ हेक्टर आहे.


अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असून, यावर्षी शेतकऱ्यांनी प्रथम सोयाबीन व दुसºया क्रमाकांवर कपाशी पेरणी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काही भाग वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत पिके बहरली असून, अनुकूल हवामान राहिल्यास यावर्षी सोयाबीनचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वºहाडात यावर्षी बुलडाणा जिल्हा वगळता उत्तम पाऊस झाला असून, शेतकºयांनी सोयाबीनला पसंती देत खरिपाच्या ३२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १४ लाख ३० हजार १५२ हेक्टरवर सोयाबीन पेरणी केली. यामध्ये सर्वात जास्त बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ५९१ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली. त्या खोलाखाल अमरावती जिल्ह्यात २ लाख ९२ हजार २४७ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात २ लाख ८७ हजार २६२ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ७१ हजार ५८४ तर अकोला जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.
मागील वर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने शेतकºयांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला असून, या पिकासाठी लागणारा पाऊस वेळेवर होत असल्याने सोयाबीन पीक बहरले आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकºयांनी तणनाशके वापरू न तणाचा नायनाट करण्यावर भर दिला असून, डवरणी तसेच या पिकाच्या वाढ व भरघोस उत्पादनासाठी विविध औषधांची फवारणी सुरू केल्याचे चित्र आहे. अल्प प्रमाणात कीड आली आहे; पण ती कीड नुकसान पातळीपेक्षा कमी असल्याने शेतकºयांनी किडींचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे.
दरम्यान, यावर्षी कापूस ९ लाख ५० हजार ८६५ हेक्टरवर पेरणी करण्यात आला असून, तुरीचीही यावर्षी ४ लाख ३४ हजार २७२ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ४१२ हेक्टर आहे.


- सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, यावर्षी पिकांना अनुकूल वातावरण आहे. असेच हवामान राहिल्यास यावर्षी सर्वच पिकांसह सोयाबीनचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता आहे.
सुभाष नागरे,
विभागीय कृषी सहसंचालक,
अमरावती.

 

Web Title: Soyabean production likely to grow in vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.