सोयाबीन, कापसाला भाव देऊन दुष्काळ जाहीर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:11 AM2017-11-01T01:11:34+5:302017-11-01T01:12:03+5:30

अकोला: शेतमालाला योग्य भाव देण्यासह जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करण्यासाठी ‘एल्गार’ पुकारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.

Soya bean, give cotton to the price of drought! | सोयाबीन, कापसाला भाव देऊन दुष्काळ जाहीर करा!

सोयाबीन, कापसाला भाव देऊन दुष्काळ जाहीर करा!

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचा ‘एल्गार ’ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शेतमालाला योग्य भाव देण्यासह जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करण्यासाठी ‘एल्गार’ पुकारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
सोयाबीन प्रतिक्विंटल किमान ५ हजार रुपये, कापूस प्रतिक्विंटल ७ हजार रुपये आणि तुरीला प्रतिक्विंटल किमान ७ हजार रुपये भाव देण्यात यावा तसेच पाऊस कमी झाल्याने जिल्हय़ात मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. 
नापिकीमुळे जिल्हय़ातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, इत्यादी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या धरणे आंदोलनात माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार तुकाराम बिरकड, प्रा. विश्‍वनाथ कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदाणी, विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, श्रीकांत पिसे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष पद्मा अहेरकर, अँड. महेश सरप, भारती नीम, राजू बोचे, छाया कात्रे, नजिमा शेख, पंकज गावंडे, नगरसेविका उषा विरक, शंकरराव चौधरी, कैलास गोंडचवर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, शिवाजी म्हैसने, डॉ. आशा मिरगे, सचिन वाकोडे, रहीम पेंटर, मनोज गायकवाड, फैय्याजभाई, अजय रामटेके, अख्तर कुरेशी, दिलीप देशमुख, नितीन झापर्डे, अजय पागृत, गौतम गवई, रूपाली वाकोडे, महादेव साबे, गजानान म्हसने, लता वर्मा, प्रमोद लहाने, डॉ. अविनाश गावंडे, श्रीधर कांबे, छाया देशमुख, छाया कात्रे, अरुणा देशमुख, पंकज बाजारे, निखिल गावंडे, ज्ञानेश्‍वर माळी, बाळासाहेब तायडे, शुभम गोंडचवर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हय़ातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सावकारी कर्जमाफीचा शेतकर्‍यांना लाभ नाही; आंदोलन छेडणार-गुलाबराव गावंडे 
परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांसाठी शासनाने दोन वर्षांंपूर्वी कर्जमाफी जाहीर केली. राज्यातील शेतकर्‍यांना सावकारी कर्जमाफी देण्यासाठी २७१ कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली; मात्र या कर्जमाफीचा लाभ अद्यापही शेतकर्‍यांना मिळाला नाही. जिल्हय़ात ३ हजार शेतकर्‍यांनी सावकारांकडे सोने गहान ठेवले आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या सावकारी कर्जमाफीसाठी सात कोटींचा निधी प्राप्त झाला; मात्र या कर्जमाफीचा लाभ केवळ १२ शेतकर्‍यांना मिळाला. उर्वरित शेतकर्‍यांना सावकारी कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे यासंदर्भात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी यावेळी दिला.

Web Title: Soya bean, give cotton to the price of drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती