ज्वारीच्या दोन जातींचे पंदेकृविने केले संशोधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:59 AM2017-10-31T01:59:26+5:302017-10-31T01:59:35+5:30

अकोला : ज्वारी हे शाश्‍वत पीक आहे. यात सर्वाधिक  पोषणमूल्य सुरक्षा असल्याने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारीवर नवे संशोधन केले. नुकतेच  पारंपरिक ज्वारीपेक्षा दीडपट  उत्पादन देणारी एसपीव्ही-२३0७  ही ठोकळ दाण्याची जात विकसित केली असून, राष्ट्रीय स्तरावर  उपयुक्त असलेल्या या जातीच्या प्रसारणासाठी कृषी विद्यापीठाने  भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) शिफारस  केली आहे. 

Revision of two varieties of sorghum done by Panduka | ज्वारीच्या दोन जातींचे पंदेकृविने केले संशोधन 

ज्वारीच्या दोन जातींचे पंदेकृविने केले संशोधन 

Next
ठळक मुद्देहेक्टरी ३८ क्विंटल उत्पादन

राजरत्न सिरसाट । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ज्वारी हे शाश्‍वत पीक आहे. यात सर्वाधिक  पोषणमूल्य सुरक्षा असल्याने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारीवर नवे संशोधन केले. नुकतेच  पारंपरिक ज्वारीपेक्षा दीडपट  उत्पादन देणारी एसपीव्ही-२३0७  ही ठोकळ दाण्याची जात विकसित केली असून, राष्ट्रीय स्तरावर  उपयुक्त असलेल्या या जातीच्या प्रसारणासाठी कृषी विद्यापीठाने  भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) शिफारस  केली आहे. 
कृषी विद्यापीठाने आतापर्यंत ११ ज्वारीच्या जाती विकसित  केल्या आहेत. मागच्यावर्षी ‘कल्याणी’ ही जात प्रसारित केली  असून, ११५ दिवसांत परिपक्व होणार्‍या या ज्वारीचे हेक्टरी ४0  क्विंटल उत्पादन आहे. विशेष म्हणजे प्रथिनेयुक्त वैरणही  हेक्टरी  १४0 क्विंटल असल्याने ‘कल्याणी’ची मागणी यावर्षी वाढली  आहे. तसेच सीएसएच-३५  कृषी विद्यापीठाची ज्वारीची जात  याच वर्षी भारतीय कृषी संशोधन परिषदेने (नवी दिल्ली) राष्ट्रीय  स्तरावर प्रसारित केली. ‘हुरड्या’ची लज्जत वाढविणारी ‘ पीकेव्ही कार्तिकी’ ही नवी जात या कृषी विद्यापीठाने याचवर्षी  महाराष्ट्राला दिली. ८२ दिवसांत हुरडा देणार्‍या ‘कार्तिकी’चे उत् पादत तर हेक्टरी ४५ ते ४८ क्विंटल आहे. नव्याने दोन जाती  विकसित करू न राष्ट्रीय प्रसारणासाठी भारतीय कृषी संशोधन  परिषदेकडे पाठविण्यात आल्या आहेत. यामध्ये रब्बी हंगामासाठी  उपयुक्त एसपीएच-१८0१ जात असून, या ज्वारीचे उत्पादन ३५  ते ३८ क्विंटल आहे. वैरणाचे उत्पादनही १00 क्विंटल एवढे  आहे.

ज्वारीत   काय आहे?
पोषणमूल्य सुरक्षा म्हणून, भारत आणि आफ्रिकेमध्ये उत्पादन घे तले जात असले, तरी ज्वारीमध्ये प्रथिने (काबरेहायड्रेड)  सर्वाधिक असून, खनिजाचे (मिनरल) प्रमाणही भरपूर आहे.  गहू, तांदळामुळे बद्धकोष्ठतेचे      प्रमाण अलीकडे वाढलेले  दिसते. ज्वारीत (फायबर) तंतूमय पदार्थ सर्वाधिक असल्याने  ज्वारी पचनासाठी उत्तम आहे. 

भाकरीसाठी सर्वाधिक उपयुक्त 
एसपीव्ही-२३0७ वेगळी जात या कृषी विद्यापीठाने विकसित  केली. विशेष म्हणजे ठोकळ दाणे असलेले हे सरळ वाण आहे.  ज्वारीचे उत्पादन हेक्टरी ३८ क्विंटल असून, पारंपरिक ज्वारी पेक्षा हे दीडपट आहे. या जातीपासून कडब्याचे उत्पादन १२५ ते  १४0 क्विंटल आहे. उत्पादन, चारा भरपूर व भाकरीची प्रत  उत्तम आहे. ही जात संपूर्ण देशासाठी प्रसारित करण्यासाठी कृषी  विद्यापीठाने आयसीएआरकडे शिफारस केली आहे.

इतर उत्पादने
ज्वारीपासून बिस्कीट, लाडू, पापड, ढिरडे असे अनेक उपपदार्थ  बनविले जातात. या पदार्थांचीही मागणी वाढली आहे.

आतापर्यंत ११ ज्वारीच्या जाती विकसित केल्या असून, यावर्षी  एसपीव्ही-२३0७ व एसपीएच-१८0१ या दोन जाती विकसित  केल्या आहेत. देशासाठी उपयुक्त असलेल्या या दोन्ही जाती  प्रसारणासाठी आयसीएआरकडे पाठविण्यात आल्या आहेत.
- रामेश्‍वर घोराडे, 
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ,ज्वारी संशोधन विभाग, 
डॉ.पंदेकृवि, अकोला.

Web Title: Revision of two varieties of sorghum done by Panduka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती