विदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 01:59 PM2018-09-24T13:59:48+5:302018-09-24T13:59:56+5:30

येत्या २९ ते ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस परतीला निघण्याची शक्यता असल्याने विदर्भातही आॅक्टोबरच्या पाहिल्या आठवड्यात पाऊस परतण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे.

rain likely to return in October from vidarbha | विदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता !

विदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता !

Next

अकोला : देशात राजस्थानमधून पाऊस परतीची अनुकूल स्थिती निर्माण होत असून,येत्या २९ ते ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस परतीला निघण्याची शक्यता असल्याने विदर्भातही आॅक्टोबरच्या पाहिल्या आठवड्यात पाऊस परतण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे.
राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडतो पण सद्या पाऊस नाही तथापि बंगालच्या उपसागरात चक्रीवादन निर्माण झाल्याने २१ सप्टेंबर रोजी विदर्भात पाऊस पडला.आता परतीच्या पावसासाठीची परिस्थिती अनुकूल आहे. प्रथम राजस्थामधून हा पाऊस परतीला निघेल त्यानंतर विदर्भ,उत्तर,दक्षिणेतून तो परत जाईल अशी स्थिती असल्याचे नागपूर वेधशाळेच्या सुत्राने सांगितले.
दरम्यान, येत्या २६ सप्टेंबरपर्यंत कोकण-गोवा, मध्य महाराष्टÑ मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

Web Title: rain likely to return in October from vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.