निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करा - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:20 PM2018-07-31T15:20:34+5:302018-07-31T15:21:26+5:30

अकोला: उत्पन्न वाढीसाठी जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांनी निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी केले.

Produce exportable pomegranates - appeal of District Collector | निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करा - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करा - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

Next
ठळक मुद्दे कृषी विद्यापीठातील शेतकरी सदन येथे आयोजित जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


अकोला: उत्पन्न वाढीसाठी जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांनी निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी केले.
जिल्हा प्रशासन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व आयएनआय कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठातील शेतकरी सदन येथे आयोजित जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, पुणे येथील डाळिंब तज्ज्ञ डॉ. सुपे उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतमालाची निर्यात करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासन, कृषी विद्यापीठ आणि संबंधित निर्यातदार कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांनी सहभागी होऊन, निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

कृषी विद्यापीठ शेतकºयांना सर्वोतोपरी मदत करणार-कुलगुरू
निर्यातक्षम शेतमालाच्या उत्पादनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकºयांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दिली. जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांनी निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन घ्यावे, त्यासाठी कृषी विद्यापीठ शेतकºयांना सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

Web Title: Produce exportable pomegranates - appeal of District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.