मोटारसायकल अपघातात एक जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:50 PM2017-10-23T16:50:04+5:302017-10-23T16:53:10+5:30

आलेगाव : मळसूर -आलेगाव रस्त्यावर २३ आॅक्टोबरच्या दुपारी २ वाजता मोटारसायकलचा अपघात होऊन कार्ला येथील एक जण गंभीर जखमी झाला.

One seriously injured in a motorcycle accident | मोटारसायकल अपघातात एक जण गंभीर जखमी

मोटारसायकल अपघातात एक जण गंभीर जखमी

Next

आलेगाव : मळसूर -आलेगाव रस्त्यावर २३ आॅक्टोबरच्या दुपारी २ वाजता मोटारसायकलचा अपघात होऊन कार्ला येथील एक जण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कार्ला येथील विकास शांताराम सोनोने हा सोमवारी दुपारी २ वाजता त्याची वहिनी शीतल नितेश सोनोने हिला एम.एच.३० ए.यू. ९६७२ क्रमांकाच्या मोटारसायकलने तिचे माहेर असलेल्या गावंडगाव येथे घेऊन जात असताना चरणसिंग चव्हाण यांच्या शेताजवळ मोटारसायकल रस्त्यावरून घसरून अपघात झाला. या अपघातात विकासच्या हातापायाला व तोंडाला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याची वहिनी शीतल सोनोने हिच्या हाताला किरकोळ जखम झाली. गंभीर जखमी असलेल्या विकास सोनोने याला प्रथम आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. फैजल यांनी प्रथम उपचार करून जखमीला अकोला येथे सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून उपचार सुरू असल्याचे समजले.(वार्ताहर)

Web Title: One seriously injured in a motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात