काँग्रेसबरोबरची आघाडीची शक्यता संपली, सर्व मतदारसंघांत उमेदवार देणार- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 10:39 AM2019-03-12T10:39:20+5:302019-03-12T10:54:02+5:30

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असल्याची माहिती दिली आहे.

not to with congress alliance, candidates will be given in all the constituencies - Prakash Ambedkar | काँग्रेसबरोबरची आघाडीची शक्यता संपली, सर्व मतदारसंघांत उमेदवार देणार- प्रकाश आंबेडकर

काँग्रेसबरोबरची आघाडीची शक्यता संपली, सर्व मतदारसंघांत उमेदवार देणार- प्रकाश आंबेडकर

Next

अकोलाः भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असल्याची माहिती दिली आहे. काँग्रेसला आम्ही 22 जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु तो त्यांनी मान्य केला नाही. काँग्रेसनं दिलेले सर्व प्रस्ताव आम्हाला अमान्य आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवार नाहीत. 15 तारखेला वंचित आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. 

लातूरचे अण्णाराव पाटील, साताऱ्याचे लक्ष्मण माने हे काँग्रेसशी आघाडीसंदर्भात चर्चा करत होते. 22 जागी आम्ही उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेस पक्षाला आमच्याकडून प्रस्ताव देण्यात आला. परंतु तो काँग्रेसनं स्वीकारला नाही.  लोकशाहीचं सामाजीकरण झालं पाहिजे. लोकशाहीच्या सामाजीकरणाचा एक भाग म्हणून समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला उमेदवारी देणं हे राजकीय पक्षांचं कर्तव्य आहे.

ज्या 22 जागी उमेदवार दिले आहेत, ते माघार घेणार नसल्याचं काँग्रेसला सांगितलं होतं. काँग्रेसनं ते उमेदवार स्वीकारावेत किंवा वंचित बहुजन आघाडीऐवजी काँग्रेसनं आपला एबी फॉर्म लावावा, अशी ऑफर आम्ही काँग्रेस पक्षाला दिली होती. काँग्रेस आमचे 22 उमेदवार स्वीकारण्यास तयार नाही. काँग्रेसकडून होकार न आल्यानं या चर्चा पुढे जातील, असं वाटत नाही. उर्वरित उमेदवारांचा निर्णय करून 15 तारखेला 48 उमेदवारांची यादी जाहीर करू, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. 

Web Title: not to with congress alliance, candidates will be given in all the constituencies - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.