अकोटात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 09:00 PM2017-11-27T21:00:07+5:302017-11-27T21:11:51+5:30

केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करित, शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याचे तसेच नाफेडच्या माध्यमातून त्वरीत ज्वारी खरेदी करण्याच्या प्रमुख मागणीकरिता अकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी हल्लाबोल आंदोलन केले.

NCP's attackball agitation in Akot! | अकोटात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन!

अकोटात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन!

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र व राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचा आरोप शेतकर्‍यांचो प्रश्न सोडविण्याची व नाफेडच्या माध्यमातून ज्वारी खरेदी  करण्याची मागणीमोटारसायकल रॅली काढून उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: केंद्र व राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचा आरोप करि त शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याचे तसेच नाफेडच्या माध्यमातून त्वरीत ज्वारी  खरेदी करण्याच्या प्रमुख मागणीकरिता अकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी हल्लाबोल आंदोलन केले. तसेच  मोटारसायकल रॅली काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी यांना  निवेदन सादर केले. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अकोला मार्गावरुन तहसिल  कार्यालयामपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी देण्यात  आलेल्या निवेदनामध्ये शेती व शेतकर्‍यांचे प्रश्न, आरक्षण, कुपोषण,  ढासळलेली शिक्षण व्यवस्था, संपकरी कर्मचार्‍यांचा प्रश्न, आश्‍वासनांची न  होणारी पुर्तता, शिष्यवृत्तीचे प्रश्न, आरोग्य व्यवस्था, विज समस्या, महागाई  आदी विविध विषयांवर सविस्तर निवेदन देण्यात आले. निवेदनातील मागण्यांचा  गांभीर्याने राज्यशासनाने विचार न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतफेर्ं तिव्र आंदोलन  छेडण्याचा इशारा देण्यात आला. 
तालुका अध्यक्ष कैलास गोंडचर, शहर अध्यक्ष इंजी.प्रमोद लहाने, राजीव बोचे,  शंकरराव चौधरी, राजू मंगळे, दयाराम धुमाळे, देवानंद र्मदाने, प्रभाकर वाघमारे,  निखील गावंडे, छाया कात्रे, वृंदा मंगळे, अजमतखाँ, एजाज अहेमद,  शशिकांत पुंडकरे, खालीद इनामदार, मंगला दिंडोकार, ज्योती कुकडे, माया  कावरे, हरिभाऊ दहिभात, राहूल हिंगणकर, सै.मतीन अहेमद, अ.शारीक,  शालीकराम वानरे, राजेश जॉन, सै.अक्रम, अक्रम इनामदार, जमीर इकबाल,  हारुन कुरेशी, जयदेव इंगळे, आनंद सोनोने, अनिता सोनोने, शुभम नारे, सलीम  भाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ांसख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
 

Web Title: NCP's attackball agitation in Akot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.