अकोल्यात ईद मिरवणुक सुवर्ण जयंतीवर मुफ्ती रशीद यांचा झाला गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:49 PM2017-12-02T15:49:38+5:302017-12-02T15:50:13+5:30

अकोला- अकोला महानगरात मुस्लिम समाजाचे मुफ्ती अब्दुल रशीद यांच्या नियंत्रणात गत पन्नास वर्षांपासून ईद मिलाद दिनावर महानगरात निघत असलेल्या ईद मिरवणुकीस पन्नास वर्ष झाल्याबद्दल मिरवणुकीचे मार्गदर्शक मुफ्ती ए बरार अब्दुल रशीद कारंजवी यांचा भावपूर्ण गौरव करण्यात आला.

Mufti Rashid honored on the golden jubilee of Eid procession in Akola |  अकोल्यात ईद मिरवणुक सुवर्ण जयंतीवर मुफ्ती रशीद यांचा झाला गौरव

 अकोल्यात ईद मिरवणुक सुवर्ण जयंतीवर मुफ्ती रशीद यांचा झाला गौरव

Next
ठळक मुद्देईद मिरवणुकीस पन्नास वर्षांचा इतिहास


अकोला- अकोला महानगरात मुस्लिम समाजाचे मुफ्ती अब्दुल रशीद यांच्या नियंत्रणात गत पन्नास वर्षांपासून ईद मिलाद दिनावर महानगरात निघत असलेल्या ईद मिरवणुकीस पन्नास वर्ष झाल्याबद्दल मिरवणुकीचे मार्गदर्शक मुफ्ती ए बरार अब्दुल रशीद कारंजवी यांचा भावपूर्ण गौरव करण्यात आला.

स्थानीय केएमटी सभागृहात अकोला कच्ची मेमन जमात च्या वतीने ईद मिरवणूक दिनावर शनिवारी आयोजित या गौरव सोहळ्यात सत्कारमूर्ती अब्दुल रशीद,अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच.वाकडे,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर,उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे,प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे,पोलीस उपाधीक्षक माने पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, मुफ्ती मो.आरिफ,मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदाम,माजी उपमहापौर रफिक सिद्धीकी,सय्यद जकी मिया बाळापुरी,मुफ्ती गुफरान,मुफ्ती गुलाम मुस्तफा आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी वाकडे यांनी मुफ्ती अब्दुल रशीद यांच्या पन्नास वर्षीय सामाजिक व धार्मिक सेवेचा आढावा घेत त्यांचा शाल व सृतिचिन्हे प्रदान करून भावपूर्ण गौरव केला.यावेळी त्यांच्या अनेकांनी दीर्घायुष्याचा कामना केल्यात .सोहळ्यात जीवन परिचय मो.शफी यांनी दिला.वली मोहम्मद यांनी अब्दुल रशीद यांच्या जीवनाचा आढावा सादर केला.तर वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी अकोला पोलीस दलातर्फे मुफ्ती अब्दुल रशीद,  ईद मिरवणूक कमिटीचे संचालन करणारे हाजी मुदाम,मुफ्ती गुफरान,अरिफ बाबा यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या गौरवला उत्तर देताना मुफ्ती अब्दुल रशीद यांनी समाजातील कर्त्या मंडळीमुळेच आपण समाजाला एकत्र करण्याचा मैलाचा टप्पा गाठू शकलो असल्याचे उदगार अब्दुल रशीद यांनी काढून सर्वांचे आभार मानलेत .मान्यवरांचे स्वागत हाजी अनीक,सलीम गाझी, सलीम सूर्या, हाजी एजाज, बुढन गाडेकर,जुम्माभाई, अड.मो.परवेज, मो.सिराजुद्दीन कुरेशी, लतीफ खत्री,युसूफ मौलवी,बिलाल ठेकिया, इजाज पहेलवान, इस्राईल भाई, सलीम सदर गवळीपुरा यांनी केले.संचालन मेमन जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी तर आभार अड .इलियास शेखांनी यांनी मानलेत.

यावेळी साजिद नाथानी,फारूक भुरानी,हनीफ मलक,सादिक लष्करीया,परवेज डोकडिया, युनूस बकाली , वाहिद मुसानी,इलियास सूर्या,यासिन बचाव ,मजीद भुरानी ,इलियास जुडा, अमीन भुरानी ,युसूफ डोकडिया, अकील घांची,रहीम कासमानी,आरिफ आमदानी, रऊफ आमदानी,इरफान पुंजानी,अनिस धामी ,वाहिद गाझी, अफजल पाकिजा,रफिक मलक, जुम्मा चौधरी ,एणहलक कुरेशी, इसाक लाला,मौलाना अरिफ इमाम ,समीर भुरानी,फारूक इलेक्ट्रिशियन,एजाज सूर्या समवेत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Web Title: Mufti Rashid honored on the golden jubilee of Eid procession in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.