चान्नी पोलिसांच्या दंडेलशाहीविरोधात खासदार-आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:49 AM2018-02-13T01:49:46+5:302018-02-13T01:50:20+5:30

अकोला: मळसूर येथे झालेल्या अपघातातील मृतकाची हत्या झाल्याचा आरोप चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केल्यानंतर पोलिसांनी एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून मळसूर, अंबाशी व चरणगाव येथील ग्रामस्थांना चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीतील जखमींनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना आपबिती सांगताच त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची भेट घेतली.

MP and MLA aggressor against the penalty of Chani police | चान्नी पोलिसांच्या दंडेलशाहीविरोधात खासदार-आमदार आक्रमक

चान्नी पोलिसांच्या दंडेलशाहीविरोधात खासदार-आमदार आक्रमक

Next
ठळक मुद्देपोलिसांची ग्रामस्थांना बेदम मारहाण, पोलीस अधीक्षकांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मळसूर येथे झालेल्या अपघातातील मृतकाची हत्या झाल्याचा आरोप चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केल्यानंतर पोलिसांनी एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून मळसूर, अंबाशी व चरणगाव येथील ग्रामस्थांना चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीतील जखमींनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना आपबिती सांगताच त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची भेट घेतली. चान्नी पोलिसांच्या या दंडेलशाहीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.
मळसूर परिसरात दीपक गडदे नामक युवकाचा २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अपघात झाला होता. या अपघातस्थळाच्या काही अंतरावर एक काठी मिळाली असून, या काठीवर रक्त सांडलेले होते. तसेच रोडवरही तीन ते चार ठिकाणी रक्ताचा सळा होता. यावरून दीपक गडदेचा अपघात झाला नसून, हत्या झाल्याची तक्रार त्यांचे मामा शिवाजी काळे यांनी चान्नी पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीच्या आधारे तसेच एका नेत्याच्या सांगण्यावरून चान्नी पोलिसांनी अंबाशी येथील रहिवासी गुणवंत रामकृष्ण महल्ले, मळसूर येथील उमेश नाना बोचरे, चरणगाव येथील गजानन सुंदरलाल देशमुख, गजानन बाबूलाल काळे, मळसूरचे सरपंच जगदीश देवकते व पंजाब हिरामन राठोड यांना मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर पंजाब राठोड व जगदीश देवकते या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यात आणले, तर उर्वरित चार ग्रामस्थांना चान्नी पोलिसांनी दोराने बांधून मारहाण केली. गजानन देशमुख, गजानन काळे, उमेश बोचरे व गुणवंत महल्ले या चार जणांना बाजीराव तसेच पट्टय़ाने मारहाण केल्याने ते प्रचंड दहशतीत आहेत. मंगळवारी रात्री मारहाण केल्यानंतर त्यांना अटक तसेच ताब्यात घेतले नसल्याचे दाखवून शुक्रवारपर्यंत मारहाण केली. 
या मारहाणीमुळे चारही जण प्रचंड भेदरल्याने त्यांनी खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर धोत्रे व सावरकर यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कलासागर यांची भेट घेऊन ग्रामस्थांवर अत्याचार करणार्‍या पोलिसांवर कारवाईची मागणी केली. या सहा जणांपैकी कुणीही या अपघात किंवा खुनात सहभागी असेल, तर त्यांच्यावर काहीही कारवाई करा, मात्र काहीही संबंध नसताना केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी ग्रामस्थांना मारहाण करणे चुकीचे असल्याचेही यावेळी धोत्रे व सावरकर यांनी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.
केवळ कुणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांना रेकॉर्डवर न घेता तब्बल मंगळवार ते शुक्रवार चार दिवस मारहाण करणे चुकीचे असल्याचा आरोप खा. संजय धोत्रे व आ. रणधीर सावरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी केला. कोणत्याही व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे बंधनकारक आहे. मात्र, चान्नी प्रकरणात पोलिसांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे दिसून येत आहे.

चौकशी करून कारवाई
चान्नी पोलिसांनी केलेला प्रकार, तसेच मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या लाचखोरीच्या गंभीर प्रकरणानंतरही पोलीस अधीक्षकांनी अद्याप कारवाई केली नसल्याचाही मुद्दा यावेळी उपस्थित झाला. त्यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून लवकरच कारवाई करणार असल्याचे आश्‍वासन दिले. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासणार असल्याचेही यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

तर उपोषणास बसू - आ. सावरकर
चान्नी व मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकारानंतरही पोलिसांनी या दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांना पाठीशी घातल्यास वरिष्ठ पोलीस अधीकार्‍यांविरोधात उपोषणास बसणार असल्याचा इशारा आ. रणधीर सावरकर यांनी दिला. गुरुवारपर्यंत कारवाई न झाल्यास भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांसह उपोषणास प्रारंभ करणार असल्याचेही यावेळी आ. रणधीर सावरकर यांनी पोलीस अधीक्षकांसमोर स्पष्ट केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक विनोद बोर्डे, गणेश पावसाळे, गिरीष जोशीही उपस्थित होते.

Web Title: MP and MLA aggressor against the penalty of Chani police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.