आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे - खासदार संजय धोत्रे

By Atul.jaiswal | Published: April 3, 2018 04:42 PM2018-04-03T16:42:18+5:302018-04-03T16:44:42+5:30

   Modern technology should be passed on to grassroots farmers - MP Sanjay Dhotre | आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे - खासदार संजय धोत्रे

आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे - खासदार संजय धोत्रे

googlenewsNext
ठळक मुद्दे पाच दिवसीय जिल्हा कृषि महोत्सवाचा समारोप आज खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थीत संपन्न झाला. खासदार संजय धोत्रे ,महापोर विजय अग्रवाल,आमदार रणधिर सावरकर यांनी यावेळी महोत्सवातील स्टॉलला भेट दिली. शेती श्रेत्रात उत्कृष्ठ काम करना-या शेतक-यांचा, स्टॉलधारकांचा, बचत गटाच्या महिलांचा सत्कार.

   अकोला: शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे असुन  त्यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे.  शेतक-यांच्या विकासासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या असुन  शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी केले.

            कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठ यांच्या संयुक्त विदयामाने विदयापीठाच्या परिसरात  आयोजित पाच दिवसीय जिल्हा कृषि महोत्सवाचा समारोप आज खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थीत संपन्न झाला, यावेळी महापोर विजय अग्रवाल,आमदार रणधिर सावरकर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, उदयान विभागाचे संचालक डॉ. नागरे , जिल्हा कृषी अधिक्षक राजेंद्र निकम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड,  कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक उमेश ठाकरे, आत्माचे प्रकल्प संचालक सुरेश बाविस्कर, सहायक संचालक कुरबान तडवी  आदींची  प्रमुख  उपस्थिती  होती .

            खासदार म्हणाले की, कृषी विदयापीठ, शास्त्रज्ञ, संशोधक यांच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान शेतीसाठी उपलब्ध झाले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठाचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी हे सर्व तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचविण्याचे काम कृषि विभाग करत आहे , अशाप्रकारचे कृषिप्रर्दशनाच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच जोडधंदाही करावा, असे आवाहन त्यांनी केले.            .

            यावेळी महापोर विजय अग्रवाल,आमदार रणधिर सावरकर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, उदयान विभागाचे संचालक डॉ. नागरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुरेश बाविस्कर यांनी केले. यावेळी शेतीश्रेत्रात उत्कृष्ठ काम करना-या शेतक-यांचा , स्टॉलधारकांचा  तसेच बचत गटाच्या महिलांचा सत्कार शाल,श्रीफळ व स्मृती चीन्ह  देऊन  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पुर्वि  खासदार संजय धोत्रे ,महापोर विजय अग्रवाल,आमदार रणधिर सावरकर यांनी यावेळी महोत्सवातील स्टॉलला भेट दिली.     कृषि प्रदर्शनात शासनाच्या विविध योजना / उपक्रमांची माहिती देणारे  शासकीय दालने, शेतीशी निगडीत खाजगी कंपन्या, उद्योजक, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे  दालने, सेंद्रिय शेतमालाची उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीची दालने तसेच आधुनिक शेती औजारांची दालने आहेत.या दालनाची त्यानी पाहणी केली .            यावेळी  कृषि शास्त्रज्ञ, कृषि व संलग्न विभागातील तज्ञ अधिकारी, शेतकरी, स्टॉल धारक उपस्थीत होते .

Web Title:    Modern technology should be passed on to grassroots farmers - MP Sanjay Dhotre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.