जून अर्ध्यावर; वऱ्हाडातील प्रकल्प कोरडेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 11:43 AM2021-06-20T11:43:40+5:302021-06-20T11:43:51+5:30

Irrigation Projects : वऱ्हाडातील ५११ प्रकल्पांमध्ये ३१.४१ टक्के साठा शिल्लक आहे.

Mid-June; The dam in varhada area are dry! | जून अर्ध्यावर; वऱ्हाडातील प्रकल्प कोरडेच!

जून अर्ध्यावर; वऱ्हाडातील प्रकल्प कोरडेच!

Next

अकोला : मान्सूनचे आगमन होऊन काही दिवस झाले आहेत; परंतु अद्यापही धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. वऱ्हाडातील ५११ प्रकल्पांमध्ये ३१.४१ टक्के साठा शिल्लक आहे. दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये एकूण मोठे, मध्यम व लघु असे ५११ प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये अमरावतीमधील ऊर्ध्व वर्धा, यवतमाळमधील पुस प्रकल्प, अरुणावली, बेंबळा, अकोलामधील काटेपूर्णा, वाण प्रकल्प, तर बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपूर्णा, अशा १० प्रकल्पांचा समावेश आहे. यावर्षी वेळेआधी राज्यात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात झाली आहे; परंतु सर्वदूर पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. अमरावती विभागात दमदार पाऊस न झाल्याने प्रकल्पांची तहान भागलेली नाही. बहुतांश लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. सद्य:स्थितीत वऱ्हाडातील प्रकल्पांमध्ये ३१.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मोठ्या ९ प्रकल्पांमध्ये ३७.१५ टक्के जलसाठा

वऱ्हाडातील मोठ्या ९ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही घट कायम आहे. काटेपूर्णा, नळगंगा, खडकपूर्णा धरण क्षेत्र भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे या सर्व ९ प्रकल्पांमध्ये केवळ ३७.१५ टक्के जलसाठा आहे.

Web Title: Mid-June; The dam in varhada area are dry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.