एक पणती शहिदाच्या नावे लावून साजरी केली दिपावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 01:04 PM2017-10-20T13:04:35+5:302017-10-20T13:07:40+5:30

लोणाग्रा गावात बुध्दविहारावर संपूर्ण गावातील ग्रामस्थ गोळा होवून शहीद सुमेध गवई यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून त्याच्या प्रतिमेसमोर एक पणती शहिदासाठी असा कार्यक्रम राबविण्यात आला. 

A mercenary was celebrated in favor of Shahida | एक पणती शहिदाच्या नावे लावून साजरी केली दिपावली

एक पणती शहिदाच्या नावे लावून साजरी केली दिपावली

Next
ठळक मुद्देलोणाग्रा गावात शहीद सुमेध गवई यांना अभिवादन

बोरगाव वैराळे :           अकोला तालुक्यातील लोणाग्रा या छोटासा गावात जन्मलेल्या सुमेध वामनराव गव ई या सैनिकाला देशाचे रक्षण करताना जम्मू काश्मीर मध्ये दि १२ आॅगष्ट २०१७ रोजी विर मरण आले होते.               त्यांच्या निधनामुळे लोणाग्रा गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली होती. त्या विर जवानला श्रध्दाजंली म्हणून संपूर्ण लोणाग्रा गावात बुध्दविहारावर संपूर्ण गावातील ग्रामस्थ गोळा होवून शहीद सुमेध गवई यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून त्याच्या प्रतिमेसमोर एक पणती शहिदासाठी असा कार्यक्रम राबविण्यात आला. गावात कुठल्याही प्रकारचे फटाके न फोडता अत्यंत साध्या पणाने दिपावलीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच निर्मला सोनोने, संजय भिलकर, शहिदाचे वडील वामनराव गवई आई मायाताई गवई गणेश भिलकर, सुधाकर गवई ,नीळकंठ कसुरकार, पवन काळे ,पंकज सोनोने, बाळु पाटील, प्रवीण कसुरकार, विनायक वैराळे, दिलीप डोंगरे आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ हजर होते.


       माझा मुलगा मागच्या दिवाळीला घरी आला होता यावर्षी त्याचे लग्न करायचे होते म्हणून तो आॅगष्ट महिन्याच्या शेवटी घरी येणार होता. त्यासाठी त्याला रजा पण मिळाली होती, मात्र रजेवर येण्यापूर्वी देशाचे रक्षण करताना तो शहीद झाला. याचे दु:ख असले तरी माझ्या लहाश्या गावाचे नाव तो देशाचे रक्षण करताना देशपातळीवर पोहोचले याचा मला सार्थ अभिमान आहे.  -  वामनराव गवई ( वडील)  
 
       सुमेध गवई देशाचे रक्षण करताना जम्मू काश्मीर मध्ये दि १२ आॅगष्ट रोजी शहीद झाला यामुळे गवई कुटुंबातील सदस्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या घरीच नव्हे तर संपूर्ण लोणाग्रा गावात अत्यंत साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा निर्णय आम्ही ग्रामस्थानी घेतला आहे. गवई परिवारातिल सदस्यांच्या दु:खात सहभागी होण्यासह शहीद सुमेध ला अभिवादन करण्यासाठी एक पणती शहिदासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. -    दिलीप डोंगरे

Web Title: A mercenary was celebrated in favor of Shahida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.