अनुदानास पात्र ७५३ उच्च माध्यमिक शाळांची यादी जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 01:20 PM2019-02-03T13:20:35+5:302019-02-03T13:20:51+5:30

अकोला: राज्यातील अनुदानास पात्र ७५३ उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी घोषित करून ३६० वाढीव पदे पुनरुज्जीवित करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशन व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत १ फेब्रुवारी बैठकीत सांगितले.

 List of 753 eligible secondary schools declared! | अनुदानास पात्र ७५३ उच्च माध्यमिक शाळांची यादी जाहीर!

अनुदानास पात्र ७५३ उच्च माध्यमिक शाळांची यादी जाहीर!

Next

अकोला: राज्यातील अनुदानास पात्र ७५३ उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी घोषित करून ३६० वाढीव पदे पुनरुज्जीवित करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशन व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत १ फेब्रुवारी बैठकीत सांगितले. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदानाची तरतूद केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विज्युक्टा व महासंघाने बारावी परीक्षेवरील बहिष्कार आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
शिक्षकांच्या मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे विज्युक्टाने आंदोलने केले. ३0 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला विभाग स्तरावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची दखल घेत शासनाने नुकतीच बैठक आयोजित केली होती. त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, विज्युक्टाचे प्रांताध्यक्ष डॉ. अविनाश बोर्ड, महासंघाचे सरचिटणीस प्रा. संजय शिंदे, विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, प्रा. विलास जाधव, प्रा. मुकुंद आंधळकर, शिक्षण उपसचिव चौधरी, नानल, उपसचिव रासकर, शिक्षण उपसंचालक अहिरे उपस्थित होते.
त्यावेळी अनुदानास पात्र अघोषित उच्च ५६० तसेच मान्यतेचे माध्यमिक कार्योत्तर १९३ तुकड्या १५ पूर्वघोषित १४३ व तुकड्या २३ अशी अनुदानाला पात्र यादी घोषित करण्याकरिता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदानाची तरतूद केली जाईल. २०१२-१३ पासून मान्यता आहे; मात्र नियुक्ती आधी झालेली आहे. त्यांना नियुक्त दिनांकापासून मान्यता व तरतुदीचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठविण्याबाबत, २०१३ पर्यंतच्या वाढीव पदाची कार्यवाही करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, निवड श्रेणी देणे, आयटी विषयाला अनुदानासह वित्त विभागाशी संबंधित इतर मागण्यांबाबत अधिवेशनापूर्वी बैठक घेण्याबाबत इतर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे १७ फेब्रुवारीपर्यंत होणाºया बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आश्वासन विज्युक्टा व महासंघाने शिक्षणमंत्र्यांना दिले; परंतु मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास असहकार आंदोलन कायम राहील, असा इशारा संघटनेने दिला. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सुरळीतपणे घेण्याचे आवाहन विज्युक्टाचे प्रांताध्यक्ष डॉ. अविनाश बोर्ड, केंद्रीय सहसचिव प्रा. संजय देशमुख, प्रा. गणेश वानखडे, महासंघ सदस्य प्रा. संतोष अहीर, केंद्रीय सदस्य प्रा. प्रवीण ढोणे, केंद्रीय कार्यालयीन सचिव प्रा. संजय गोळे, जिल्हाध्यक्ष प्रा.डी.एस. राठोड, जिल्हा सचिव प्रा. पंकज वाकडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. श्रीराम पालकर यांनी केले.



अशी जाहीर केली पात्र शाळांची यादी
उच्च माध्यमिक- ५६0
कार्योत्तर मान्यता- १९३
पूर्वघोषित- १४३
तुकड्या- २३

 

Web Title:  List of 753 eligible secondary schools declared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.