अकोला : जितेंद्र वाघ मंगळवारी स्वीकारणार आयुक्त पदाचा पदभार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 02:04 AM2017-12-25T02:04:33+5:302017-12-25T02:05:48+5:30

अकोला : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची १0 नोव्हेंबर रोजी बदली करण्यासोबतच मनपाच्या आयुक्तपदी ‘एमएमआरडीए’मध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत जितेंद्र वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला होता. मागील दीड महिन्यापासून रिक्त असणार्‍या महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार जितेंद्र वाघ २६ डिसेंबर रोजी स्वीकारणार असल्याची माहिती आहे. 

Jitendra Wagh takes charge on Tuesday! | अकोला : जितेंद्र वाघ मंगळवारी स्वीकारणार आयुक्त पदाचा पदभार! 

अकोला : जितेंद्र वाघ मंगळवारी स्वीकारणार आयुक्त पदाचा पदभार! 

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाच्या आयुक्त पदाचे ग्रहण सुटले!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची १0 नोव्हेंबर रोजी बदली करण्यासोबतच मनपाच्या आयुक्तपदी ‘एमएमआरडीए’मध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत जितेंद्र वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला होता. मागील दीड महिन्यापासून रिक्त असणार्‍या महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार जितेंद्र वाघ २६ डिसेंबर रोजी स्वीकारणार असल्याची माहिती आहे. 
 महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची नगरविकास विभागाने १0 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली क रीत मनपाच्या आयुक्तपदी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मध्ये कार्यरत उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला होता. अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर जितेंद्र वाघ आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारतील, अशी अपेक्षा होती. दीड महिन्याचा कालावधी होऊनही जितेंद्र वाघ यांनी महापालिकेची सूत्रे न स्वीकारल्यामुळे मनपासह राजकीय वतरुळात चर्चेला सुरुवात झाली होती. मनपाचे तत्कालीन उपायुक्त समाधान सोळंके यांना कार्यमुक्त केल्यामुळे सदर पद अद्यापही रिक्त आहे. सद्यस्थितीत मनपाच्या स्थानिक अधिकारी, कर्मचार्‍यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे शहरातील मूलभूत सुविधा कोलमडल्या आहेत. नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असणार्‍या ‘एमएमआरडीए’ने जितेंद्र वाघ यांना कार्यमुक्त केले आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी वाघ महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार असल्यामुळे मनपाची विस्कटलेली घडी लवकरच पूर्वपदावर येणार असल्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. 

Web Title: Jitendra Wagh takes charge on Tuesday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.