जनुना पुनर्वसन शेतशिवारात दूषित पाण्याने आठ शेळ्य़ा  ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:36 AM2017-08-18T01:36:02+5:302017-08-18T01:36:21+5:30

सायखेड : जनुना पुनर्वसन शिवारात अज्ञात व्यक्तीने  कालबाह्य औषधांच्या बॉटल, सलाइन, मुदतबाह्य गोळ्या  एका नाल्यात फेकून दिल्या होत्या.त्यामुळे तलावातील  पाणी दुषित झाले होते. हे दुषित पाणी पिल्याने ८ शेळ्य़ा ठार  झाल्या तर २५ शेळ्यांचा गर्भपात झाल्याची घटना १५  ऑगस्ट रोजी घडली. गावातील इतरही गुरांना आजाराने  ग्रासले आहे. 

Januba rehabilitation killed eight goats in water from polluted areas | जनुना पुनर्वसन शेतशिवारात दूषित पाण्याने आठ शेळ्य़ा  ठार

जनुना पुनर्वसन शेतशिवारात दूषित पाण्याने आठ शेळ्य़ा  ठार

Next
ठळक मुद्देमुदतबाह्य औषधसाठा टाकला साचलेल्या पाण्यात! शेळीपालन व्यवसाय करणार्‍या पशुपालकाच्या बकर्‍या 

लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेड : जनुना पुनर्वसन शिवारात अज्ञात व्यक्तीने  कालबाह्य औषधांच्या बॉटल, सलाइन, मुदतबाह्य गोळ्या  एका नाल्यात फेकून दिल्या होत्या.त्यामुळे तलावातील  पाणी दुषित झाले होते. हे दुषित पाणी पिल्याने ८ शेळ्य़ा ठार  झाल्या तर २५ शेळ्यांचा गर्भपात झाल्याची घटना १५  ऑगस्ट रोजी घडली. गावातील इतरही गुरांना आजाराने  ग्रासले आहे. 
जनुना पुनर्वसन येथे पावसाळ्य़ाचे पाणी साचलेल्या  ठिकाणी अज्ञात इसमाने मुदतबाह्य औषध साठा टाकला.  ही औषध पाण्यात मिसळल्याने पाणी दुषित झाले.हे पाणी  तेथे चरण्यासाठी गेलेल्या शेळ्य़ांनी प्राशन केले. त्यामुळे,  त्यातील आठ शेळ्य़ांचा मृत्यू झाला तर २५ बकर्‍यांचा गर्भ पात झाला. तसेच अन्य गुरे आजारी पडले. यामध्ये प्रकाश  तुकाराम इंगळे या शेळीपालन व्यवसाय करणार्‍या पशु पालकाच्या सर्वाधिक बकर्‍या आहेत. या घटनेची माहिती  पशुसंवर्धन विभागाचे डॉ. बी. टी. अस्वार यांना देण्यात  आली. धाबा पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. रंजवे, रामराव  राठोड यांनी तातडीने जनुना येथे जाऊन आजारी बकर्‍यांवर  उपचार केले. सरकारी औषधसाठा कमी असल्यामुळे  बकर्‍यांना औषधे मिळू शकली नाहीत. पशुसंवर्धन  विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देऊन  आजारी व विषबाधेने गंभीर असलेल्या शेळ्य़ांवर उपचार  करावा, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे. 

१५ गुरांचा मृत्यू
विझोरा : येथे अज्ञात आजाराने गत दहा दिवसांत  पंधराच्यावर जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांत भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे. पशुधन विभागाने याची  वेळीच दखल घेऊन, या रोगाचे निदान लावून उपचार  करण्याची मागणी पशुपालकांमध्ये होत आहे.
विशेषत: गाय व वासरांना या अज्ञात आजाराने ग्रासले  आहे. एकाकी एका पायावर सुज येऊन त्यामध्ये तत्काळ  जनावरांचा अचानक मृत्यू होतो. आतापर्यंत गाय व त्यांच्या  वासरांचा मृत्यू झाला आहे. या अज्ञात आजाराने पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रोजच  दोन ते तीन जनावरे दगावण्याच्या घटना घडत आहेत.

Web Title: Januba rehabilitation killed eight goats in water from polluted areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.