झांबड पिता-पुत्राच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:38 AM2017-11-10T01:38:54+5:302017-11-10T01:40:55+5:30

अकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ात मुख्य आरोपी असलेल्या दीपक झांबड व त्याचे पिता रमेश गजराज झांबड यांच्या अटकपूर्व नियमित जामीन अर्जावरील मंगळवारी असलेली सुनावणी शुक्रवारपर्यंंत पुढे ढकलण्यात आली आहे.

The hearing on the bail application of zambad-father-son today | झांबड पिता-पुत्राच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज

झांबड पिता-पुत्राच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज

Next
ठळक मुद्देआरोपींच्या वकिलांनी मागितला वेळ २0 कोटींचा भूखंड घोटाळा

अकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ात मुख्य आरोपी असलेल्या दीपक झांबड व त्याचे पिता रमेश गजराज झांबड यांच्या अटकपूर्व नियमित जामीन अर्जावरील मंगळवारी असलेली सुनावणी शुक्रवारपर्यंंत पुढे ढकलण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांनी काही दस्तावेज सादर करण्यास वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने त्यांना १0 नोव्हेंबरपर्यंंत वेळ दिली आहे.
अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून, तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपण्यात आला. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले, तसेच पाठपुरावा केला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. त्यांनी तपास पूर्ण करून भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांच्यासह भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४६७, ४६८, ४७१, १२0 ब, आयटी अँक्ट कलम ६५ नुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दीपक झांबड व रमेश झांबड या दोघांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, त्यांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवार, १0 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

घोटाळय़ातील महत्त्वाचे दस्तावेज हस्तगत
आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी तपासाला गती दिली असून, भूमी अभिलेख विभागातील तीन संगणकांच्या हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. त्यानंतर काही महत्त्वाचे दस्तावेज हस्तगत करण्यात आले असून, घोटाळय़ातील काही दस्तावेजांची तपासणी करण्यात येत आहे. या दस्तावेजांमधून झांबड यांच्याविरुद्ध महत्त्वाचे पुरावे प्राप्त झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: The hearing on the bail application of zambad-father-son today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.