महिलेला शरीर सुखाची मागणी करणारा मुख्याध्यापक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 06:34 PM2018-10-27T18:34:01+5:302018-10-27T18:34:19+5:30

अकोट : बदनामी करण्याची धमकी देउन महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाला अकोट ग्रामीण पोलिसांनी २७ आॅक्टोबर रोजी अटक केली. सुधीर भानुदास कोलटक्के असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.

The headmaster arested for demanding sex to a women | महिलेला शरीर सुखाची मागणी करणारा मुख्याध्यापक गजाआड

महिलेला शरीर सुखाची मागणी करणारा मुख्याध्यापक गजाआड

Next

अकोट : बदनामी करण्याची धमकी देउन महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाला अकोट ग्रामीण पोलिसांनी २७ आॅक्टोबर रोजी अटक केली. सुधीर भानुदास कोलटक्के असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. आरोपीला अकोट न्यायालसमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २९ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बोरवडी येथील जिल्हा परिषद शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक असलेला सुधीर भानुदास कोलटक्के (३७) याने एका ३५ वर्षीय महिलेला तुझे फोटो व्हायरल करतो.तू माज्या सोबत मैत्री कर, असे म्हणून बदनामी करण्याची धमकी देत होता.बदनामी टाळायची असल्यास महिलेला शरीर सुखाची मागणी कोलटक्के याने केली.तसेच गजानन महाराज विहिरीवर त्याने विनयभंग सुद्धा केला.अशी तक्रार पीडित महिलेने शुक्रवारी रात्री अकोट ग्रामीण पोलिसांत दिली.ठाणेदार मिलिंदकुमार बहाकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले.त्यावरून पोलिसांनी सुधीर कोलटक्के याच्या विरुद्ध भादंवी कलम ३५४,३५४ अ, १ (१),(२) नुसार गुन्हा दाखल केला. तसेच एएसआय नारायण वाडेकर, गजानन भगत,अनिल सिरसाट,नंदू कुलट यांचे तत्काळ पथक गठीत करून सुधीर कोलटक्के या शिक्षकाला अमरावती येथून शुक्रवारी रात्री अटक केली.त्याला २७ आॅक्टोबर रोजी अकोट न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २९ आॅक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार मिलींदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनुराधा पाटेखेडे करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The headmaster arested for demanding sex to a women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.