सातपुड्याच्या पायथ्याशी फुलली हळदीची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:54 PM2019-05-12T13:54:33+5:302019-05-12T13:55:06+5:30

अकोट :- सातपुड्याच्या पायथ्याशी आता थेट हळदीच्या भट्या लागत असल्याचे चित्र आहे. परंपरागत पिकांना फाटा देत शेतकरी आता वन औषधे व इतर पिके घेण्याकडे वळला असल्याचे सुखदायक चित्र पहावयास मिळत आहे.

Haldi farming flourished at the foot of Satpuda | सातपुड्याच्या पायथ्याशी फुलली हळदीची शेती

सातपुड्याच्या पायथ्याशी फुलली हळदीची शेती

Next

- विजय शिंदे

अकोट :- सातपुड्याच्या पायथ्याशी आता थेट हळदीच्या भट्या लागत असल्याचे चित्र आहे. परंपरागत पिकांना फाटा देत शेतकरी आता वन औषधे व इतर पिके घेण्याकडे वळला असल्याचे सुखदायक चित्र पहावयास मिळत आहे.
कापूस, तूर, सोयाबीन, गहू, ज्वारी आदी पारंपरिक पिके या भागात घेतल्या जातात. त्यानंतर संत्रा, केळी या फळबागांकडे शेतकरी वळला; मात्र खरीप हंगाम वगळता बाजारात मागणी असलेली पिके घेण्याकडे शेतकरी वळला आहे. कमी खर्चात, कमी दिवसात जास्त उत्पन्न देणाऱ्या हळद लागवडीने सातपुडा बहरला आहे. हळदीचे उत्पादन घेण्यापासून तर हळद बॉईल करून पॉलीश केल्यानंतर ती तयार करेपर्यंतच्या भट्ट्या शेतकऱ्यांनी आता शेतात लावल्या आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी मलकापूर गोंड येथील परिसरात अक्षय संजय तळोकार या युवा शेतकºयाने दोन एकर हळद पेरली. वाडेगाव येथून हळदीचे ११८५ किलो बेणं घेऊन आठ महिन्यांपूर्वी दोन एकरात लागवड केली. या लागवडीनंतर खत, फवारणी, मजुरी असा एकूण ९८ हजार रुपयांचा खर्च केला. हळदीचे पीक बहरल्यानंतर ते काढून १९ हजार क्विंटल ओली हळद झाली. ती हळद बॉईल करून सुकविल्यानंतर तयार केली असता, ४० क्विंटल हळदीचे पीक झाले. बाजार भावानुसार या शेतकºयाने प्रतिक्विंटल सात हजार रुपये भावाने ती हळद विक्री केल्यानंतर दोन लाखाच्या आसपास नफा कमावला. स्वयंपाकघरात हळद मसाल्याचे पदार्थ म्हणून वापरल्या जाते. शिवाय तिचे औषध गुणधर्म सर्वज्ञात आहेत. बाहेरगावावरून येणाºया हळदीची गुणवत्ता पाहता सातपुड्याच्या पायथ्याशी तयार झालेली हळद कितीतरी पटीने उत्कृष्ट असल्याचे हळद उत्पादक शेतकरी अक्षय तळोकार यांचे म्हणणे आहे. आता तर थेट ठोकच नव्हे तर चिल्लर भावातसुद्धा या भागातील शेतकºयांनी हळदीची घरोघरी व बाजारपेठेत विक्री सुरू केली आहे. या माध्यमातून अतिरिक्त रोजगाराची निर्मिती शेतकरी करीत आहेत. अकोट तालुक्यात आधीच दुष्काळसदृश परिस्थिती असताना खरीप हंगामानंतर बागायती पिके संकटात आहेत. अशा स्थितीत हळदीसारख्या पिकांनी मजुरांनासुद्धा रोजगार मिळवून दिल्याचे दिसून येते.
 

 

Web Title: Haldi farming flourished at the foot of Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.