ग्रासरूट इनोव्हेटर : शेतपिकावरील किडींना अटकाव घालतोय सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:33 PM2019-01-01T12:33:49+5:302019-01-01T12:34:08+5:30

शेतातील किडींना एका विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाचे आकर्षण असते.

Grassroot Innovator: Solar Light Insect Trap, Preventing Insect on crop | ग्रासरूट इनोव्हेटर : शेतपिकावरील किडींना अटकाव घालतोय सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप

ग्रासरूट इनोव्हेटर : शेतपिकावरील किडींना अटकाव घालतोय सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप

Next

- राजरत्न सिरसाट ( अकोला)

किडीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होते. यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषध फवारणीचा वापर करतात. तरीही कीटकांना अटकाव होत नाही. मात्र, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कीटकांना अटकविण्यासाठी सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप विकसित केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकावरील किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी मदत होत आहे.

शेतातील किडींना एका विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाचे आकर्षण असते. रात्री अंधारात किडी प्रकाशाकडे झेप घेतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप विकसित करण्यात आला आहे. हा ट्रॅप बोंडअळी नियंत्रणासाठी उपयुक्त असून, त्याचा वापर केल्यास कीड नियंत्रण होऊ शकते. विद्यापीठाने विकसित केलेल्या या उपकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालते. या उपकरणातून निघणारा विशिष्ट प्रकाश हा किडींना आकर्षित करून घेतो.

किडींना मारण्याची प्रक्रिया रोज होत असल्याने याद्वारे किडींची पुढची पिढीच नष्ट होते. या उपकरणात सोलर फोटो व्होलटाईन पॅनल, चार्ज कंट्रोलर  आणि पॅनल उत्सर्जित झालेली ऊर्जा साठविण्यासाठी लीड अ‍ॅसिड बॅटरी वापरण्यात आली आहे. हे उपकरण पूर्णता स्वयंचलित असून, पहाटे दोन तास व सायंकाळी चार तास सुरू तसेच बंद होतो. हे उपकरण दोन एकर क्षेत्रफळापर्यंत कार्य करू शकते. या उपकरणावर वातावरणाचा काहीही परिणाम होत नाही. भर पावसातही पतंग इकडे-तिकडे उडून शेतातील पिकांवर अंडे घालतात. मात्र, या ट्रॅपमधील प्रकाशाकडे आकर्षित होऊन ते मरण पावत असल्याने तो उपयोगी ठरत आहे. हे उपकरण अनेक वर्षे चालत असल्यामुळे दरवर्षी होणारा औषधी फवारणीचा खर्च ७० ते ८० टक्क्यांपर्यंत बचत होऊन उत्पन्नात वाढ होते.

Web Title: Grassroot Innovator: Solar Light Insect Trap, Preventing Insect on crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.