रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:48 PM2018-09-26T12:48:46+5:302018-09-26T12:48:55+5:30

अकोला : राज्यात यावर्षी पूरक पाऊस असल्याने पिके बहरली असून, रब्बी हंगामातही पेरणी वाढणार असल्याने महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) आतापासूनच रब्बी हंगामातील बियाण्याचे नियोजन केले आहे.

Grams sowing areal will be broaden | रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार!

रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार!

googlenewsNext

अकोला : राज्यात यावर्षी पूरक पाऊस असल्याने पिके बहरली असून, रब्बी हंगामातही पेरणी वाढणार असल्याने महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) आतापासूनच रब्बी हंगामातील बियाण्याचे नियोजन केले आहे. हरभरा पिकाची पेरणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन यावर्षी २ लाख ३१ हजार क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील काही बियाण्यांना अनुदान दिले जाणार आहे.
राज्यात सलग तीन ते चार वर्षांपासून पावसाची अनिश्चितता असल्याने शेतकºयांना रब्बी हंगामातील पिके हव्या त्या प्रमाणात घेता आली नाहीत. मागील वर्षी तर जवळपास क्षेत्र कोरडे होते; पण यावर्षीची परिस्थिती उत्तम असून, बुलडाणा जिल्हा वगळता बºयाच ठिकाणी पावसाने सरासरी गाठली आहे. चांगल्या पावसामुळे शेतकºयांच्या आशा रब्बी हंगामासाठी पल्लवित झाल्या आहेत. याच पृष्ठभूमीवर महाबीजने राज्यातील रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे.
यावर्षी महाबीजने रब्बी ज्वारीचे २४ हजार क्ंिवटलचे नियोजन केले. मागच्या वर्षी हे ३० हजार क्ंिवटल होते. करडईचे नियोजन मागच्या वर्षी ९०० क्ंिवटल होते. ते यावर्षी ४५० क्ंिवटलच करण्यात आले. हरभºयाचा २ लाख ३१ हजार क्ंिवटल बियाण्यांचा यामध्ये समावेश आहे. गहू बियाण्याचेही एक लाख क्ंिवटल बियाणे शेतकºयांना उपलब्ध करू न दिले जाणार आहे. यावर्षी मूग, उडीड आणि सोयाबीनच्या क्षेत्रावर रब्बी हरभºयाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास ३५ लाख हेक्टरच्यावर सोयाबीनचे क्षेत्र आहे. यावर्षी वेळेवर पेरणी व पिके चांगली असल्याने सोयाबीनचा हंगाम लवकर संपेल. त्यामुळे या क्षेत्रावर रब्बीचे नियोजन करण्यात शेतकºयांना वाव आहे. सोयाबीनच्या क्षेत्रावर शक्यतोवर शेतकरी हरभरा पेरणी करीत असतो. परिणामी, यावर्षी हरभºयाचे क्षेत्र दुप्पट वाढण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामासाठी लागणारी ज्वारी, करडई, हरभरा बियाण्याचे नियोजन केले आहे. हरभरा क्षेत्र वाढण्याची शक्यता बघता यावर्षी २ लाख ३१ हजार क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी राष्टÑीय कृषी विकास योजना ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत नियोजन करण्यात आले असून, शेतकºयांना कोणत्या बियाण्यांना अनुदान द्यायचे, याचे जिल्हानिहाय नियोजन करण्यात येत असल्याने दोन दिवसांनंतर हे स्पष्ट होईल.
- रामचंद्र नाके,
महाव्यवस्थापक (विपणन),
महाबीज, अकोला.

 

Web Title: Grams sowing areal will be broaden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.