माजी केंद्रीय अधिका-यांनी सोयीनुसार बदलविले रंग अंधत्वाचे नियम

By admin | Published: October 15, 2015 02:36 AM2015-10-15T02:36:30+5:302015-10-15T02:36:30+5:30

‘रंग अंधत्वा’चे लोण संपूर्ण राज्यभर पसरलेले.

Former Union officials changed the convenience of color blindness | माजी केंद्रीय अधिका-यांनी सोयीनुसार बदलविले रंग अंधत्वाचे नियम

माजी केंद्रीय अधिका-यांनी सोयीनुसार बदलविले रंग अंधत्वाचे नियम

Next

राम देशपांडे / अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या केंद्रीय कार्यालयाने ५ मार्च २00९ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात रंग अंधत्व हा दृष्टिदोष असल्याचे स्पष्ट केले असून, खोटी प्रमाणपत्रे सादर करून बसचालक पदाची नोकरी मिळविणार्‍या कर्मचार्‍यांना थेट बडतर्फ करण्याचे स्पष्ट निर्देश असताना, तत्कालीन केंद्रीय महाव्यवस्थापकांनी सोयीनुसार २१ जुलै २0१२ रोजी एक पत्रक काढून दृष्टिदोषासंदर्भात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणार्‍या चालकांना ह्यसुरक्षा रक्षकह्ण या पर्यायी सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिलेत. राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना ते पत्रक निर्गमित करण्यात आले असल्याने, रंगअंधत्वाचा दोष असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून सुरक्षारक्षक पदावर नोकरी मिळविणार्‍या बसचालकांचे प्रकरण केवळ धुळे, बुलडाणा आणि अकोल्यापुरतेच र्मयादित नसून, संपूर्ण राज्यात त्याचे लोण पसरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रंगअंधत्वाचा (नजरेतील) दोष असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून चालक पदावरून सुरक्षारक्षक पदावर नोकरी मिळविणार्‍या बुलडाणा विभागातील १९ बसचालकांवर ७ ऑक्टोबर २0१५ रोजी गुन्हे दाखल झाले. गत काळात धुळे विभागातदेखील ह्यकलर ब्लाइंडनेसह्णचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणाची टांगती तलवार अकोला विभागातील २७ बसचालकांवरदेखील लटकत आहे. ज्या विभागात अशी प्रकरणे घडलीत, त्या विभागात चौकशी समितीमार्फत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रापमच्या केंद्रीय अधिकार्‍यांनी आरंभली आहे. रापमचे तत्कालीन महाव्यवस्थापक (कामगार व औद्योगिक संबंध) यांनी ५ मार्च २00९ रोजी जारी केलेल्या परिपत्रक क्र. ७/२00९, पत्र क्र. १0३१ मध्ये रापमच्या सरळसेवा भरती अस्थापनेवर व त्यांच्या अधिपत्याखाली गट ह्यअह्ण ते गट ह्यडह्ण या पदांना अपंगत्वाचे आरक्षण लागू करण्याबाबत दिशानिर्देश दिले असून, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी ते स्वच्छक अशी ११ पदे वगळता अंध, कर्णबधिर तथा अस्थिव्यंग असलेल्या व्यक्तीस १ टक्का आरक्षण देण्याबाबची तरतूद त्यात केली आहे. या परिपत्रकात सुरक्षा रक्षक पदाकरिता अंध, अल्पदृष्टी, कर्णबधिर, अस्थिव्यंग असलेली व्यक्ती सुरक्षारक्षक पदाकरिता अपात्र ठरविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १७ सप्टेंबर २00९ रोजी राप महामंडळाने जारी केलेल्या पत्र क्र. २१४/आस्था/४८६ ई/ ३८२९ मध्ये शारीरिक पात्रता विनियम ६ व ७ मध्ये कर्मचार्‍यांच्या दृष्टीविषयक चाचणीसंदर्भात तरतुदी करण्यात आल्या आहेत. परंतु त्यांचे योग्यरीतीने पालन होत नसल्याने चालकांच्या दृष्टी तपासणीबाबत नेत्रतज्ज्ञांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Former Union officials changed the convenience of color blindness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.