अर्भक नालीत फेकणाऱ्या कुमारी मातेसह पाच ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 02:16 PM2019-05-15T14:16:51+5:302019-05-15T14:17:07+5:30

अकोला: केळीवेळी येथील एका नाल्यात सहा महिन्यांच्या स्त्री जातीचे अर्भक फेकणाºया कुमारी मातेसह तिचा प्रियकर व आई-वडिलांसह एका डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

Five arested with mother for throw newborn baby in dranage | अर्भक नालीत फेकणाऱ्या कुमारी मातेसह पाच ताब्यात

अर्भक नालीत फेकणाऱ्या कुमारी मातेसह पाच ताब्यात

Next

अकोला: केळीवेळी येथील एका नाल्यात सहा महिन्यांच्या स्त्री जातीचे अर्भक फेकणाºया कुमारी मातेसह तिचा प्रियकर व आई-वडिलांसह एका डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या आरोपींना दहीहंडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
केळवेळी येथील रहिवासी अनिल दिनकर आडे यांच्या घराशेजारी असलेल्या एका नाल्यात ३० एप्रिल रोजी सहा महिन्यांच्या नवजात स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले होते. या प्रकरणाची माहिती आडे यांनी दहीहंडा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला असता हे स्त्री जातीचे अर्भक याच गावातील रहिवासी असलेल्या एका कुमारी मातेचे असल्याचे समोर आले. समाजात बदनामी होऊ नये या भीतीपोटी सदर कुमारी माता व तिच्या आईने या स्त्री जातीचे अर्भक विल्हेवाट लावण्यासाठी नालीत टाकले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सदर कुमारी मातेला विश्वासात घेतल्यानंतर तिने याच गावातील रहिवासी असलेला शेख कलीम शेख जलील २७ याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती दिली. या प्रेमसंबंधातूनच तिला गर्भधारणा झाली आणि यामध्येच ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली; मात्र समाजात बदनामी होण्याच्या भीतीने तिने प्रियकराच्या मदतीने गर्भपाताच्या गोळ्या घेऊन तिचा गर्भपात केला. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर सदर गर्भपात करण्यासाठी डॉक्टर बलराम मंडल, मुलीचे आई-वडील यांनी सहकार्य केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेऊन दहीहंडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली छाया वाघ, दिनकर बुंदे, संदीप काटकर, भावलाल हेंबाडे भाग्यश्री मेसरे यांनी केली.

 

Web Title: Five arested with mother for throw newborn baby in dranage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.