बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 06:30 PM2019-06-24T18:30:50+5:302019-06-24T18:31:05+5:30

अकोला : जिल्हयातील काही भागात रविवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरू वात केली असून, बियाणे बाजारात सोयाबीन, कापसाची मागणी वाढली आहे.

Farmers run for the purchase of seeds! | बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ !

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ !

Next

अकोला : जिल्हयातील काही भागात रविवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरू वात केली असून, बियाणे बाजारात सोयाबीन, कापसाची मागणी वाढली आहे. दरम्यान,अनेक ठिकाणी श्ोतकºयांनी पेरणीला सुरू वात केली पंरतु ७५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला असेल तरच पेरणी करावी असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला.
जिल्ह्याला यावर्षी कपाशी बियाण्यांचे ७ लाख २० हजार पाकीटांची नोंदणी करण्यात आली होती. पंरतु आतापर्यंत ५ लाख ३ हजार ६४२ संकरीत कपाशीचे पाकीट उपलब्ध झाले आहेत. ७० हजार क्ंिवटल सोयाबीने बियाणे उपलब्ध आहेत. सोयाबीन बियाण्याची मागणी ५० हजार ५०० क्ंिवटल होती. यावर्षी २० हजार क्ंिवटल बियाणे अधिक प्राप्त झाले असून, बाजारात उपलब्ध आहे. तूरीचे १५ हजार ५० क्ंिवंटल बियाणे उपलब्ध आहेत. मूग १३ हजार,उडीद १० हजार ९५ तर ज्वारीचे ६०४ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध आहेत.
मान्सूनला यावर्षी पुन्हा उशीर झाला. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच रविवारी जिल्ह्यात काही भागात बºयापैकी पाऊस पडला. रविवारी पाऊस पडताच श्ेतकºयांनी सोमवारी बियाणे खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केली. सोयाबीन,कपाशी व तूरीचे बियाणे खरेदी करण्याकडे शेतकºयांचा कल होता. संकरीत कपाशी पाकीटांची शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात खरेदी केली. सोयाबीन बियाणेही खरेदी करण्यात आले. सोयाबीनमध्ये काही ठिकाणी शेतकरी तूर हे आंतरपीक घेत असल्याने तूर बियाण्यांची खरेदी करण्यात आल्याची माहिती कृषी निविष्ठा तज्ज्ञ मिलींद सावजी यांनी दिली.
७५ मि.मी.त्यापेक्षा अधिक पाऊसच पेरणीसाठी योग्य आहे.तथापि रविवारी पडलेल्या पावसाचे प्रमाण कमी जास्त आहे.त्यामुळे पडलेल्या पावसाचे प्रमाण बघून शेतकºयांनी पेरणीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. हलक्या व मध्यम स्वरू पाच्या शेतात कमी पाऊस पडला असेल तर शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये.आता पिकात फेरबदल करण्याची गरज असून, ज्वारीचा पेरा वाढविण्याची गरज आहे.जनावरांना पोष्टीक वैरणही यापासून मिळत असल्याने ज्वारी पेरणीची शिफारस कृषी विद्यापीठाने केली आहे.
- बीज प्रक्रिया करा !
पेरणीपुर्वी शेतकºयांनी बीज प्रक्रिया करू नच पेरणी करणे क्रमप्राप्त आहे.अलिकडे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, तूर पिकावरही हा प्रादुर्भाव दिसत आहे. बियाण्यांचा बिज प्रक्रिया केल्यास मर रोगापासून पिकांना वाचवता येईल तसेच पेरणीसोबत खताची मात्रा द्यावी.

 

Web Title: Farmers run for the purchase of seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.