विमानात बसायचे, संसद, राष्ट्रपती भवन पाहायचे स्वप्न ‘लोकमत’मुळे साकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:53 PM2018-07-02T14:53:14+5:302018-07-02T14:57:10+5:30

मोठं होऊन विमानात बसण्याचे स्वप्न बालवयातच ‘लोकमत’मुळे साकार झाले, अशी प्रतिक्रिया बोरगाव मंजू येथील हवाई सफर विजेता विद्यार्थी अंशुल सचिन निवाणे (१३) याने व्यक्त केली.

 Dream of airplane, Parliament, Rashtrapati Bhavan fulfeel by lokmat | विमानात बसायचे, संसद, राष्ट्रपती भवन पाहायचे स्वप्न ‘लोकमत’मुळे साकार!

विमानात बसायचे, संसद, राष्ट्रपती भवन पाहायचे स्वप्न ‘लोकमत’मुळे साकार!

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’तर्फे आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत अंशुल निवाणे याने सहभाग घेतला आणि या स्पर्धेत तो जिल्ह्यातून विजेता ठरला. रात्री हवाई सफरवरून परत आलेल्या अंशुलने ‘लोकमत’शी रविवारी दुपारी संवाद साधला आणि दिल्ली प्रवासाच्या आठवणी कथन केल्या.‘लोकमत’चे जेवढे आभार मानावेत, तेवढे कमी आहेत, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.


अकोला : आई... मला छोटेसे विमान दे ना... विमान घेईन... आकाशी उडविन... असेच स्वप्न मुले बालपणी रंगवितात. मुलांना विमानाचे भारी आकर्षण. विमानात बसून, आकाशाची छान सैर करायची हौस असते. परंतु, ती हौस काही पूर्ण होत नाही. परंतु, त्यांची ती स्वप्ने, त्यांची हौस भागविण्याचे काम ‘लोकमत’ने केले. बालवयातच विमान सफरीसोबतच संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी केवळ ‘लोकमत’मुळेच मिळाली. मोठं होऊन विमानात बसण्याचे स्वप्न बालवयातच ‘लोकमत’मुळे साकार झाले, अशी प्रतिक्रिया बोरगाव मंजू येथील हवाई सफर विजेता विद्यार्थी अंशुल सचिन निवाणे (१३) याने व्यक्त केली.
‘लोकमत’तर्फे आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत अंशुल निवाणे याने सहभाग घेतला आणि या स्पर्धेत तो जिल्ह्यातून विजेता ठरला. नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफरसाठी त्याची निवड झाली. २६ जूनला रात्री हवाई सफरवरून परत आलेल्या अंशुलने ‘लोकमत’शी रविवारी दुपारी संवाद साधला आणि दिल्ली प्रवासाच्या आठवणी कथन केल्या. संस्कारांचे मोती उपक्रमांतर्गत हवाई सफरसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत अंशुल २६ जूनला सकाळी ८ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचल्यावर तेथील विमाने पाहून अक्षरश: मी भारावून गेले. हे सर्व माझ्यासाठी स्वप्नवत होते. विमानात बसल्यावर दिल्लीला दीड तासांत आम्ही सर्वजण पोहोचलो. पहिल्यांदाच विमानात बसण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दिल्लीला गेल्यावर गोवा, महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांचीही भेट दिली. विमानतळावर बस घ्यायला आली. बसमध्ये बसूनच राजधानी दिल्लीची सैर केली. जे टीव्हीवर पाहायचो. ते प्रत्यक्षात बघायला मिळाले, याचा आनंद वाटला. दुपारी १.३0 वाजता राष्ट्रपती भवनला पोहोचलो. अंशुल सांगत होता, याठिकाणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी स्वागत केले. त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगत, जीवनातील संघर्ष सांगितला आणि त्यांनी जेही करा ते आवडीने, आत्मविश्वाने करा, असा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांनी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन संवाद साधला. एवढेच नाही, तर राष्ट्रपती भवन, संसद भवन, इंडिया गेट, ऐतिहासिक लाल किल्लासुद्धा पाहायला मिळाला. अशा शब्दात अंशुल त्याचे प्रवास वर्णन सांगत होता. सायंकाळी ६ वाजता दिल्ली विमानतळावरून आम्ही नागपूरकडे हवाई उड्डाण केले. एकूणच संपूर्ण प्रवास आनंददायी आणि स्वप्नवत होता, असे अंशुल म्हणाला.
 


विमान, दिल्ली अनुभवण्याचे स्वप्न पूर्ण झाले
अंशुल निवाणे हा बोरगाव मंजू येथील माउंट कारमेल शाळेत इयत्ता सातवीत शिकतो. वडील सचिन निवाणे किराणा दुकान चालवितात. वडील सचिन, आई नीता यांनी, आम्ही कितीही मनात आणले असते, तरी अंशुलला विमानात बसविण्याचे स्वप्न साकार करू शकलो नसतो. परंतु, लोकमत संस्कारांचे मोती स्पर्धेमुळे त्याला विमान, दिल्ली येथील ऐतिहासिक स्थळे अनुभवण्याची संधी मिळाली. राजकीय नेत्यांसोबत संवाद साधायला मिळाला. त्यामुळे ‘लोकमत’चे जेवढे आभार मानावेत, तेवढे कमी आहेत, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

Web Title:  Dream of airplane, Parliament, Rashtrapati Bhavan fulfeel by lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.