फार्मासिस्टच्या नावाखाली औषध विक्रेते वेठीस

By admin | Published: August 18, 2014 01:31 AM2014-08-18T01:31:00+5:302014-08-18T01:45:14+5:30

अकोला येथील अन्न व औषध प्रशासन करतेय धाकदपट करून ‘वसुली’

Detergent sellers in the name of pharmacist | फार्मासिस्टच्या नावाखाली औषध विक्रेते वेठीस

फार्मासिस्टच्या नावाखाली औषध विक्रेते वेठीस

Next

सचिन राऊत / अकोला

औषध दुकानदारांनी फार्मासिस्टच्या देखरेखीतच औषधांची विक्री करण्याचे निर्देश आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी याची अंमलबजावणी करण्यासाठी असले तरी त्यांनी फार्मासिस्टचा धाक दाखवून औषध दुकानदारांना वेठीस धरणे सुरू केले आहे. औषध दुकानांमध्ये क मी शिक्षित व्यक्तींकडून रुग्णांना औषधी देण्यात येत आहेत. ग्रामीण भागात फार्मासिस्ट नसलेले औषधी दुकान जास्त प्रमाणात असून, ही बाब रुग्णांच्या जीवावर बेतणारी आहे. रुग्णांचा जीव वेठीस धरण्याचाच हा प्रकार असल्याने प्रशासनाने औषधी दुकानांमध्ये फार्मासिस्टची नियुक्ती करणे अनिवार्य केले आहे. जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर औषध दुकानांमध्ये फार्मासिस्टच नाहीत. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून औषध दुकानांची तपासणी करण्यात येते; मात्र फार्मासिस्ट नसलेल्या औषध दुकानांवर कारवाई न करता त्यांना वेठीस धरून त्यांच्याकडून वसुली करण्यात येत असल्याची माहिती औषध दुकानदारांनीच नाव न छापण्याच्या अटीवर दिली. ग्रामीण भागातील बहुतांश औषध दुकानदारांकडून वसुली करण्यात येत असून, याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. *औषध प्रशासनाच्या कारवाईत भेदभाव अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांकडून ग्रामीण भागातील औषध दुकानांवर करण्यात येत असलेल्या कारवाईत भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप आहे. तालुका स्तरावरील संघटनेच्या पदाधिकारी व वसुलीमध्ये अग्रेसर असलेल्या औषध दुकानाच्या संचालकांना कारवाईतून सूट देण्यात येत असून, इतर दुकानदारांवर कारवाई करून त्यामधून अर्थकारण करण्यात येत असल्याची माहिती आहे. *फार्मासिस्टपेक्षा हप्ता परवडणारा औषध दुकानामध्ये १२ ते १५ हजार रुपये महिन्याने फार्मासिस्ट ठेवल्यापेक्षा अधिकार्‍यांना ३ ते ५ हजार रुपये महिना हप्ता पुरविण्यात येत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे एवढय़ा महागाईचा फार्मासिस्ट ठेवल्यापेक्षा कारवाई टाळण्यासाठी अधिकार्‍यांशी साटेलोट करण्याचाच प्रयत्न औषध दुकानदारांकडून करण्यात येत आहे. *एकाच पदवीवर दोन व्यवसाय ग्रामीण भागात एकाच पदवीवर दोन औषध दुकान चालविण्यात येत असून, याकडे अन्न व औषध प्रशासन विभागातील एक अधिकारी ह्यमनीषाह्ण पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती आहे. एकाच पदवीवर दोन ठिकाणी व्यवसाय करण्यात येत असल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आहेत. *दवा बाजारातील एजन्सीवरून वसुली दवा बाजारातील एका एजन्सीवर ग्रामीण भागातील औषध दुकानांची वसुली जमा करण्यात येते. त्यानंतर या ठिकाणावरून संबंधित अधिकार्‍यांकडे ही रक्कम पोहोचविण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. *अधिकार्‍यांची थंड हवेच्या ठिकाणी सहल चोहोट्टा बाजार येथील एका औषध दुकानदाराने कारवाई टाळण्यासाठी अधिकार्‍यांच्या कुटुंबासाठी सहल आयोजित केली होती. अधिकार्‍यांची चिखलदरा येथे हॉटेल व एसी वाहनाची व्यवस्था केल्यानंतर अधिकार्‍याने खाल्लय़ा मिठाला जागत या दुकानावर कारवाई करण्याचे टाळले.

Web Title: Detergent sellers in the name of pharmacist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.