कुटुंबीय आजीचा मृतदेह आणण्यासाठी गेले असता नातवाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:29 AM2017-12-09T01:29:18+5:302017-12-09T01:33:21+5:30

व्याळा : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाचा डोंगर,  वडिलांच्या अपघातानंतर  दवाखान्याचा आलेला खर्च, अशा परिस्थितीमध्ये काकांच्या घरी आजीचा मृत्यू  झाल्याने कुटुंबीय तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी गेले असता, व्याळा येथील २३  वर्षीय शेतकरी पुत्राने ८ डिसेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या  केली. गणेश वसंता राऊत, असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. 

Daughter committed suicide when the family went to bring her grandmother's body | कुटुंबीय आजीचा मृतदेह आणण्यासाठी गेले असता नातवाने केली आत्महत्या

कुटुंबीय आजीचा मृतदेह आणण्यासाठी गेले असता नातवाने केली आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे शेतकरी पुत्राने विवंचेनेपायी गमावला जीव आजी-नातवावर अंत्यसंस्कार 

लोकमत न्यूज नेटवर्क
व्याळा : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाचा डोंगर,  वडिलांच्या अपघातानंतर  दवाखान्याचा आलेला खर्च, अशा परिस्थितीमध्ये काकांच्या घरी आजीचा मृत्यू  झाल्याने कुटुंबीय तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी गेले असता, व्याळा येथील २३  वर्षीय शेतकरी पुत्राने ८ डिसेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या  केली. गणेश वसंता राऊत, असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. 
व्याळा येथील वसंता राऊत यांना दोन भाऊ असून, वसंता व सोपान राऊत हे व्याळा  येथे वास्तव्यास असून, शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. लहान भाऊ  नवृत्ती राऊत हे शिक्षक असून, ते अकोट येथे राहतात. त्यांच्या सोबतच आई  अनसूयाबाई या अकोटात वास्तव्यास होत्या. वृद्धापकाळाने त्यांचे ८ डिसेंबर रोजी  सकाळी निधन झाल्याने त्यांच्यावर व्याळा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याचे  राऊत परिवाराने ठरविले. त्यानुसार वसंता राऊत यांचे कुटुंबीय अकोट येथे मृतदेह  आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, गणेश वसंता राऊत हा दुपारी घरी आला असता,  आजीचे निधन झाल्याची माहिती त्याला कळाली व त्याने घरात कोणीही नसल्याचे  पाहून गळफास घेऊन आत्महत्या केली. 
संध्याकाळच्या सुमारास अनसूयाबाईचा मृतदेह गावात आल्यावर अंत्यसंस्कार  करावे लागतील म्हणून तयारीला लागलेल्या शेजारी व नातेवाईकांनी घराचे दार  उघडून पाहिले असता गणेशने गळफास घेतल्याचे दिसून आल्याने एकच खळबळ  उडाली. 
 गणेश वसंता राऊत याच्या वडिलांच्या नावाने  तीन एकर शेती आहे. या शेतीत  त्यांना गेल्या काही वर्षांपासून अल्प उत्पन्न होत होते. गणेश याच्या वडिलांचा काही  दिवसांपूर्वीच अपघात झाला आहे. त्यांच्या उपचारावर बराच खर्च झाला.  आजारावर खर्च, बँका, सावकाराचे कर्ज आणि सततची नापिकी यामुळे खचून  गेलेल्या गणेश वसंता राऊत याने राहत्या घरात ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाज ता गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी कुटुंबातील दोघांवर अं त्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ राऊत कुटुंबीयांवर आली. 
 

Web Title: Daughter committed suicide when the family went to bring her grandmother's body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.