पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही; शिवसैनिकांची विमा कार्यालयात ताेडफाेड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 02:32 PM2023-11-09T14:32:33+5:302023-11-09T14:33:16+5:30

कंपनीच्या कार्यालयात घुसून खुर्च्यांची ताेडफाेड, गुरूवारची घटना

Crop insurance proceeds not yet received; Payment of Shiv Sainiks in insurance office | पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही; शिवसैनिकांची विमा कार्यालयात ताेडफाेड

पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही; शिवसैनिकांची विमा कार्यालयात ताेडफाेड

अकाेला: दिवाळी ताेंडावर आली असताना, आश्वासन देऊनही पीक विमा नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आराेप करीत काही शिवसैनिकांनी काैलखेडराेडवरील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात घुसून खुर्च्यांची ताेडफाेड केल्याची घटना गुरुवारी घडली. यावर्षी पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान झाले असून, साेयाबीन-कापसाचा उतारा घटला आहे. इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पिके वाहून गेली आणि जमीनही खरडून गेली. या सर्व प्रतिकूल परिस्थितीची शासन, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे ऑफिस फोडू, असा इशारा (उबाठा) शिवसेनेने दिला होता. परंतु अद्याप दखल घेतली गेली नसल्याचा आराेप करीत शिवसैनिकांनी पीक विमा कंपनीच्या अकोला जिल्हा कार्यालयात ताेडफाेड केली.

Web Title: Crop insurance proceeds not yet received; Payment of Shiv Sainiks in insurance office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.