विषय शिक्षक नियुक्तीच्या फाइलवर ‘सीईओं’चे शिक्कामोर्तब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:58 PM2019-01-05T12:58:35+5:302019-01-05T12:58:42+5:30

विषय शिक्षकांच्या नियुक्तीच्या फाइलवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे विषय शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Chief excucative officer sign the teachers' appointment files! | विषय शिक्षक नियुक्तीच्या फाइलवर ‘सीईओं’चे शिक्कामोर्तब!

विषय शिक्षक नियुक्तीच्या फाइलवर ‘सीईओं’चे शिक्कामोर्तब!

Next

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ४७३ शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर अद्याप त्या शिक्षकांना नियुक्ती मिळालेली नाही. त्यासाठी तातडीने वेळापत्रक जाहीर न केल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर विषय शिक्षकांच्या नियुक्तीच्या फाइलवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे विषय शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार सहावी ते आठवी विषय शिक्षकांची ५५३ पदे रिक्त असल्याने विषय शिक्षकांची नियुक्ती करावी आणि सेवाज्येष्ठतेनुसार समुपदेशनाने ही पदे भरावीत, शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अकोला जि.प.मध्ये विषय शिक्षकांच्या पदभरतीअभावी सहायक शिक्षक अतिरिक्त झाल्याने, त्यांना रॅन्डम राउंडमध्ये तालुका बदलून नियुक्ती दिली होती. अशा शिक्षकांना विषय शिक्षकांच्या नियुक्तीनंतर होणाºया समायोजनात समाविष्ट करून जिल्हा स्तरावर समायोजन करावे, यासह इतर समस्या शिक्षक संघटना समन्वय समितीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मांडल्या होत्या. सोबतच शिक्षक परिषदेने पालकमंत्री रणजित पाटील यांनासुद्धा प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली होती. त्यानंतर तीन महिने उलटूनही विषय शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे शिक्षक परिषदेने जिल्हा परिषद प्रशासनाला आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी विषय शिक्षक नियुक्तीच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे सोमवारपासून विषय शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

जुने पदवीधर शिक्षकांचे समायोजन
जुने पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरले असून, या नऊ अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यात आली असून, त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया शनिवारी ‘सीईओं’च्या दालनात राबविल्या जाणार असल्याचे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी दिले आहे.

अकोटातील शिक्षकांच्या समायोजनास विरोध
अकोट तालुक्यातील १६ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनास शिक्षक परिषदेने विरोध दर्शविला असून, याविरुद्ध शिक्षक परिषदेतर्फे शनिवारपासून उपोषण करण्यात येणार आहे. समायोजनासाठी दोन वेगवेगळ्या याद्या प्रकाशित केल्या. त्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली नाही. इतर तालुक्यांमध्ये पर्यायी व्यवस्था केल्यानंतर अकोटमध्ये समुपदेशाने समायोजन का केले जात आहे, पहिल्या यादी आठ रिक्त जागा असताना, त्या अचानक १६ जागा कशा झाल्या, यासह इतर प्रश्नांना घेऊन शिक्षक परिषद उपोषण करणार आहे.

 

Web Title: Chief excucative officer sign the teachers' appointment files!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.